शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेकडे जलसंपदाने मागितली २०३२ पर्यंत किती पाण्याची आवश्यकता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 20:40 IST

महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये झालेला करार फेब्रुवारी २०१९ मध्ये संपुष्टात आला असून हा करार सहा महिन्यांसाठी वाढवून घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रस्तावाचे काम सुरु : पाणी पुरवठा विभागाकडून दोन महिन्यात सादर केली जाणार माहिती  पुण्याची लोकसंख्या ५२ लाखांच्या घरात , शहराला सुधारित करार करुन प्रतिदिन १३३४.५० प्रमाणे (वार्षिक १७ टीएमसी) पाणी देण्याची मागणीजलसंपदाने मागितले होते लोकसंख्येने ५० लाखांचा टप्पा पार केल्याचे पुरावे

पुणे : जलसंपदाने पालिकेला २०३२ सालापर्यंत नेमके किती पाणी लागणार आहे याची विचारणा केली असून त्यानुसार नविन प्रस्ताव तयार करुन पाठविण्यास सांगितले आहे. त्यानुसार पालिकेने नवीन प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली असून त्यामध्ये दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाकडून मंजूर करुन घेण्यासंदर्भात दोन्ही विभागांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी दिली. महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये झालेला करार फेब्रुवारी २०१९ मध्ये संपुष्टात आला असून हा करार सहा महिन्यांसाठी वाढवून घेण्यात आला आहे. पालिकेने वाढीव पाणीकोटा मागणारा प्रस्ताव जलसंपदा विभागाला दिला होता. पुण्याची लोकसंख्या ५२ लाखांच्या घरात असून शहराला सुधारित करार करुन प्रतिदिन १३३४.५० प्रमाणे (वार्षिक १७ टीएमसी) पाणी देण्याची मागणी पालिकेने पत्राद्वारे केली होती. त्यासाठी लोकसंख्येने ५० लाखांचा टप्पा पार केल्याचे पुरावे जलसंपदाने मागितले होते. पालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लोकसंख्येबाबत विचारणा केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने पालिकेला आधारकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार जिल्हा मतदान विभाग, आधार नोंदणी कार्यालय, आरोग्य विभागासह लोकसंख्येसंदर्भात काम करणाऱ्या  शासकीय यंत्रणांकडून माहिती मागविण्यात आली. या माहितीच्या आधारे निश्चित केलेल्या लोकसंख्येनुसार वाढीव पाणी कोट्याची मागणी करण्यात आली होती.पाणी वापराच्या ठरविण्यात आलेल्या मानकांनुसार ५० लाख लोकसंख्या असलेल्या शहराला १३५ लिटर पाणी प्रतिव्यक्ती देणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेचा पाणी वापर दुप्पट आहे. त्यामुळे महापालिकेने वषार्ला ८.१९ टीएमसी पाणी घेण्याचे आदेश जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने लोकसंख्येच्या आधारावर दिले होते. शहराची लोकसंख्या ४८ लाख गृहीत धरुन ११.५० टीएमसी पाणी कोटा प्रतिवर्षी राज्य शासनाने मंजूर केलेला आहे.=====महापालिकेने जलसंपदा विभागाला फेब्रुवारीमध्ये पाठविलेल्या पत्रामध्ये शहराला सध्या दर दिवसाला १३३४.५० एलएलडी (वार्षिक १७ टीएमसी) पाणी आवश्यक असून नवीन करार करताना, खडकवासला धरणसाखळी व भामा-आसखेड धरण असा एकत्रितरित्या १७ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवावा अशी मागणी पालिकेने या पत्रामध्ये केली होती. परंतु, जलसंपदाकडून पालिकेला २०३२ सालापर्यंत पालिकेची पाण्याची आवश्यकता किती असणार आहे, याची माहिती विचारण्यात आली. त्यानुसार, नविन प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. =====  

आधार नोंदणी                                                36 लाख 59 हजार,           आधार नोंदणी राहिलेले                                3 लाख 66 हजार,   5 वर्षे आणि त्या खालील मुले                       4 लाख 80 हजार  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड लोकसंख्या (2011 नुसार)              72 हजार   खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड                                        79 हजार  पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालये             82 हजार 527   स्वायत्त महाविद्यालये                               15 हजार विद्यार्थी   आश्रम, मठ, अनाथालय                               1452 मुले   शाळा, हॉस्टेल                                              2 हजार  शासकीय निवासी वसाहती                          2 लाख 22 हजार   वसतिगृहे                                                    24 हजार 604  दरवर्षी शहरात नागरिकांचेहोणारे स्थलांतर (5 टक्के)                      2 लाख 50 हजार 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी