शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

उजनीतून भीमा नदीत सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:17 IST

८१०० क्युसेक्सने विसर्ग : एकूण १० दरवाजे उघडले, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

इंदापूर : उजनी धरणातून भीमानदीला संक्रांतीच्या मुहर्तावर मंगळवारपासून ८१०० क्युसेक्सने भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. यामुळे पंढरपूर व सोलापूर शहरासाठी व नदीकाठच्या गावांसाठी पाणी सोडल्याचे उजनी धरण व्यवस्थापन उपविभाग भीमानगर यांनी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वीजनिर्मितीसाठी सोमवारी सायंकाळी ८ वाजल्यापासून १६०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते, तर नदीला मंगळवारी सकाळी ८ वाजता ६५०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे, असे एकूण ८१०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.

औज बंधाऱ्याची व पंढरपूरच्या बंधाºयाची पाणीपातळी कमालीची खालावली असून रब्बी हंगाम पण सुरू असल्याने सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना व सोलापूर शहराला पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पाणी सोडण्याचे प्रशासनाने चार दिवसापूर्वीच जाहीर केले होते. त्यादृष्टीने उजनी धरण व्यवस्थापन विभागाने मंगळवारी मकरसंक्रांतीच्या महूर्तावर पाणी सोडले आहे. असे असले तरी धरणाची पाणीपातळी कमालीची कमी झालेली दिसून येते. गेल्या वर्षी १५ जानेवारीला एकूण १०२ टक्के धरणात पाणी होते. आज रोजी धरणात ३९.७३ टक्केएवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे येणाºया काळात सोलापूर जिल्ह्यातील शेती पुढे मोठे संकट येऊन ठेपले आहे. त्यामुळे सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.सध्या उजनी धरणामध्ये एकूण पाणीपातळी ४९३.७२० मीटर आहे, तर एकूण पाणीसाठा २४०५.६३ दलघमी आहे. त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा ६०२.८२ दलघमी असून त्याची टक्केवारी ३९.७३ टक्के आहे. उजनीमध्ये सध्या एकूण ८४.९४ टीएमसी पाणी असून त्यामध्ये केवळ २१.२९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणी