लासुर्णे : पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभाराचा फटका ३६ क्रमांच्या वितरिकेवरील शेतकºयांना बसला आहे. जोरदार पाऊस झाल्यानंतर, हेतुपूर्वक वितरिका क्रमांक ३६ मधून कुरवली येथील शेतीमध्ये पाणी सोडल्यामुळे येथील शेतात पाणी साचले आहे. याचा फटका पिकांना बसला आहे.नीरा डावा कालव्यावरील वितरिका क्रमांक ३६ मधून टेलला कुरवलीचे क्षेत्र आहे. गुरुवारी संध्याकाळी कुरवली परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे ठिकठिकाणी शेतामध्ये पाणी साचले आहे. शेतामधील पाण्याचा निचरा कसा करायचा, या विचारात असलेल्या शेतकºयांना पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी पाणी आवर्तन सोडले. हे पाणी शेतात गेल्याने पिके पाण्याखाली आलीत. पाणी सोडायचे होते तर फाट्यामध्ये चारींनी सोडायला पाहिजे होत,े विनाकारण शेतीमध्ये पाणी का सोडले, असा सवाल शेतकरी वगार्तून व्यक्त होत आहे.गेल्या वर्षी कुरवली येथील शेतीला वेळेत पाणी आवर्तन न सोडल्याबाबत शेतकºयांनी माहिती अधिकाराचे पत्र पाटबंधारे शाखेला दिले होते. त्या पत्राचा राग पाटबंधारे विभागाने शेतकºयांवर काढला, असा आरोप शेतकºयांनी केला.नीरा डावा कालव्यावरील वितरिका क्रमांक ३६ मधून कुरवली परिसरात सुरू असलेले पाणी तत्काळ बंद करून झालेली नुकसानभरपाई पाटबंधारे विभागाने द्यावी, असे येथील शेतकरी दिलीप उंडे, बबन थोरवे, पांडुरंग थोरवे, नीलेश पांढरे, सुनील माने, दत्तात्रेय माने, मनोज निकम, सतीश माने, संपत माने यांनी केली आहे.सध्या नीरा डावा कालव्याचे शेटफळ हवेली तलावात आवर्तन सुरू आहे. गुरुवारी (दि. ७) रात्री बारामती परिसरात १३५ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे कालव्याचे पाणी व पावसाचे पाणी यामुळे कालव्याला धोका पोहोचला असता. पाणी कालव्याच्या भराव्यावरून वाहिले असते. अशा वेळी अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी एसकेएफ (खुष्कीचा मार्ग) ने पाणी सोडले जाते. नीरा डावा कालव्याचे या परिसरातील एक एसके एफ बंद आहे. त्यामुळे आम्हाला ३६ क्रमांकाच्या वितरिकेमधून पाणी सोडावे लागले.- सुभाष आकोसकर,कार्यकारी अभियंता,बारामती पाटबंधारे विभाग
कुरवली येथे वितरिकेत सोडलेले पाणी घुसले शेतात, पिके पाण्याखाली : नुकसानभरपाई देण्याची शेतकºयांची मागणी,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:29 IST