चाकण-तळेगाव रस्त्यावर सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:23+5:302021-04-11T04:11:23+5:30
चाकण- तळेगाव रस्ता हा वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते परंतु रस्त्यावर पाणी येत असल्यामुळे दुचाकी वाहनांसह ...

चाकण-तळेगाव रस्त्यावर सोडले पाणी
चाकण- तळेगाव रस्ता हा वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते परंतु रस्त्यावर पाणी येत असल्यामुळे दुचाकी वाहनांसह मोठ्या वाहनचालकांना कसरत करावी लागत आहेत. या ठिकाणी केमिकल- ऑइलमिश्रित पाण्यावरून वाहनांचे छोटे-मोठे अपघात घडत आहेत तसेच पादचा-यांना तर जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत आहेत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गटाराचे घाण पाणी रस्त्यावर साचत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही काही ठोस उपाय होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, चाकण औद्योगिक परिसरात प्रदूषणाची समस्या काही नवीन नाही. एकीकडे उग्र वासाने नागरिकांना श्वास घेणे देखील मुश्किल झालेय तर दुसरीकडे रासायनिक सांडपाणी थेट वाहतुकीच्या रस्त्यावरच जमा होत असल्याने नाईलाजाने चालकांना या सांडपाण्यातूनच वाट काढत जावे लागतेय. त्यामुळे रासायनिक कंपन्या या सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट लावत नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झालेय. प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेमुळे येथील प्रदूषणाचा कायम आहे.
१० महाळुंगे
रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहने.