भीमाई आश्रमशाळेला मिळाले पाणी
By Admin | Updated: July 13, 2015 23:48 IST2015-07-13T23:48:54+5:302015-07-13T23:48:54+5:30
पाण्याचा टँकर नियमित व वेळेत यावा, या मागणीसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी शासकीय कार्यालयांवर काढलेला मोर्चा

भीमाई आश्रमशाळेला मिळाले पाणी
इंदापूर : पाण्याचा टँकर नियमित व वेळेत यावा, या मागणीसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी शासकीय कार्यालयांवर काढलेला मोर्चा, तहसील कार्यालयासमोर मांडलेला ठिय्या यामुळे हादरलेल्या प्रशासनाने, रविवारी (दि. १२) भीमाई आश्रमशाळेवर टँकर पाठवलाच; शिवाय सोमवारी (दि. १३ जुलै) सकाळी वेळेत विहिरीत टँकरने पाणीपुरवठा केला.
सोळा हजार लिटर साठवण क्षमतेच्या टँकरने, ज्या विहिरीतून भीमाई आश्रमशाळेला पाणीपुरवठा केला जातो, त्या विहिरीत पाणी सोडले जाणार आहे. कालव्याचे पाणी येईपर्यंत टँकर बंद केला जाणार नाही, असे या वेळी पाणीपुरवठा करणाऱ्या सूत्रांनी सांगितले. याबाबत रत्नाकर मखरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या आठवड्यात वसतिगृहात पाणीपुरवठा करणारी विहीर, तीन विंधनविहिरी आटल्या आहेत. याबाबत तहसील कार्यालय, पंचायत समिती यांच्याकडे टँकरसाठी मागणी करण्यात आली होती. मात्र या पाणीपुरवठ्यामध्ये अनियमितता होती. याकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी (दि. १२) या विद्यार्थ्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते.