वाढदिवसाचा खर्च टाळून बँकेला वॉटर प्युरिफायर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:14 IST2021-08-29T04:14:31+5:302021-08-29T04:14:31+5:30

डिंभे : आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व युवा उद्योजक गणेश भाऊ कारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गणेश ...

Water purifier to the bank avoiding birthday expenses | वाढदिवसाचा खर्च टाळून बँकेला वॉटर प्युरिफायर

वाढदिवसाचा खर्च टाळून बँकेला वॉटर प्युरिफायर

डिंभे : आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व युवा उद्योजक गणेश भाऊ कारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गणेश कोकणे मित्र मंडळाच्यावतीने वाढदिवसाचा खर्च टाळून डिंभे येथील पुणे जिल्हा सहकारी बँकेतीस ग्राहकांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून वॉटर प्युरिफायर भेट दिला आहे. यामुळे बँकेच्या कामासाठी दूरवरून येणाऱ्या ग्राहकांना पिण्याचे थंड व शुद्ध पाणी मिळण्याची व्यवस्था झाली आहे.

या वेळी आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समिती माजी उपसभापती नंदा सोनावले, घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जीवन माने, बंटी काळे, श्रीरंग कोकणे, दत्ता शेठ कोकणे, संतोष राक्षे, गौतम खरात, प्रदीप अमोंडकर, संदीप चपटे यांनी उपस्थित होते.

---

फोटो क्रमांक : २८ डिंभे वाढदिवस वॉटर

ओळी- वॉटर प्युरिफायर युनिटचे लोकार्पण करताना पदाधिकारी.

Web Title: Water purifier to the bank avoiding birthday expenses