बारामतीतील दुष्काळी गावांचा पाणीप्रश्न सुटणार

By Admin | Updated: January 20, 2015 23:38 IST2015-01-20T23:38:50+5:302015-01-20T23:38:50+5:30

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मात्र, आता हा पाणीप्रश्न मिटणार आहे.

Water problems of drought-hit villages of Baramati will continue | बारामतीतील दुष्काळी गावांचा पाणीप्रश्न सुटणार

बारामतीतील दुष्काळी गावांचा पाणीप्रश्न सुटणार

बारामती : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मात्र, आता हा पाणीप्रश्न मिटणार आहे. तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम उपविभाग यांच्यामार्फत एकूण ९६ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यातील ५१ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित सर्व कामे लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांनी दिली.
बारामती तालुक्यात बहुतांश गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिरायती भागातील गावांची स्थिती भयाण आहे. सध्याच्या संभाव्य टंचाईग्रस्त आराखड्यामध्ये तालुक्यातील ३१ गावांचा आणि २६९ वाड्यावस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी पंचायत समितीतर्फे ९६ पाणीपुरवठा योजनांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यातील ५१ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यात प्रगतिपथावरील कामे २२ आहेत, तर निविदास्तरावर असणारी कामे १२ आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम विभागाच्या १ जानेवारीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर सहा कामे विविध योजनांतर्गत रखडलेली आहेत. कधी निधी अभावी, तर कधी ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे ही कामे रखडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या उपविभागांतर्गत बिगर आदिवासी योजनेंतर्गत १६ कामांपैकी फक्त ९ कामे पूर्ण आहेत. यात काळखैरेवाडी, वडगाव निंबाळकर, मोरगाव, कुरणेवाडी, गुणवडी, जराडवाडी, मेडद लाटे, वंजारवाडी येथील पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर, वर्धित वेग कार्यक्र मांतर्गत १४ कामे, स्वजलधारा योजनेंतर्गत पारवडी येथील कोकणेवस्ती आणि साबळेवाडी येथील कामे पूर्ण करण्यात आली आहेत. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत बारामती तालुक्यातील एकमेव जोगवडी येथील काम ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे बंद पडले आहे. भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत तालुक्यात चार कामे पूर्ण झाली आहेत. चोपडज, गोजूबावी, वाकी, बऱ्हाणपूर येथील पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण झाली आहेत. पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे
महाजल राज्यस्तर योजनेंतर्गत करंजेपूल येथील विहिरीचे काम ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे बंद आहे. मेखळी येथील काम पूर्ण झाले आहे. पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मुर्टी येथील चिरखानवाडीतील पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. योजना नूतनीकरणात तालुक्यातील घाडगेवाडी, कोळोली, शेंडेकरवाडी, सुपा, नीरा वागज, कांबळेश्वर, तावरेवस्ती, काळाओढा (शिरवली), कोऱ्हाळे बु. येथील पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पेशवेवस्ती (कोऱ्हाळेवस्ती), सदोबाची वाडी, आबाजीनगर, होळ, गाढवे वस्ती (होळ), कोेकरे वस्ती (बाबुर्डी) येथील कामे पूर्ण झाली आहेत. तर, सोनवडी सुपे, गोजूबावी, आंबी खु, मतकरवस्ती (कोऱ्हाळे वस्ती) येथील कामे निविदास्तरावर आहेत. एकात्मिक पाणीव्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत नीरावागज, उंडवडी सुपे, मोढवे, बालगुडेपट्टा येथील पाणीपुरवठ्याचे काम पूूर्ण करण्यात आलेले आहे. तर, कऱ्हा वागज, उंडवडी सुपे येथील काम निविदास्तरावर आहे.

४खासदार निधी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत बऱ्हाणपूर, चौधरवाडी नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती याचे काम पूर्ण करण्यात येऊन नळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. खांडज येथील मागासवर्गीय नळ पाणीपुरवठा योजना निविदा स्तरावर आहेत. जैनक वाडी, मगरवाडी येथील काम पूर्ण करण्यात आली आहे. तर, यशंवत ग्राम विकास योजनेंतर्गत तालुक्यातील घाडगेवाडी, वडगाव निंबाळकर, गुनवडी येथील भूमिगत गटरांचे कामे पूर्ण करण्यात आले असल्याचे बारामती पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम उपविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
४तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत बारामती तालुक्यातील निंबूत येथील श्रीक्ष्ोत्र भैरवनाथ मंदिर देवस्थान, सोनगाव येथील श्रीक्षेत्र सोनेश्वर मंदिर, श्रीक्षेत्र कण्हेरी येथे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. ३८ लाख २६ हजार निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी निंबूत, सोनगाव येथील कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, कण्हेरी येथील काम अपूर्ण आहे.
४तालुक्यात राबविलेल्या योजना आणि योजनांतील कामांची संख्या पुढीलप्रमाणे : बिगर आदिवासी (१६), वर्धित वेग कार्यक्रम (१४), स्वजलधारा (२), राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम (१), भारत निर्माण कार्यक्रम (४), महाजल राज्यस्तर योजना (४), एकात्मिक पाणी व्यवस्थापन कार्यक्रम (१४), खासदार निधी स्थानिक विकास कार्यक्रम (६), तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम (३), जिल्हा परिषद स्तरावर (५), यशवंत शरद ग्रामविकास योजना (५), योजना नूतनीकरण कार्यक्र म (२१) .

 

Web Title: Water problems of drought-hit villages of Baramati will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.