शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटल्याने दुसऱ्या मजल्यापर्यंत पाण्याचे कारंजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 18:34 IST

पुण्यातील धानाेरी भागातील पाण्याची पाईपलाई बुधवारी दुपारी फुटल्याने लाखाे लिटर पाणी वाया गेले. पाण्याचा वेग इतका हाेता की दुसऱ्या मजल्यापर्यंत पाण्याचे कारंजे उडत हाेते.

पुणे :  धानोरी येथील जकातनाका परिसरात पोरवाल रस्त्याच्या सुरुवातीला बुधवारी (दि. ३०) सायंकाळी चारच्या सुमारास  जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याच्या दाबामुळे २ मजल्यांच्यापेक्षा जास्त उंचीवर सुमारे २० मिनिटे पाण्याचे कारंजे उडत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या वाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला.    

    ज्याठिकाणी जलवाहिनी फुटून पाण्याचे कारंजे उडत होते, तेथे पाहणी केली असता जलवाहिनीचा 'एअर व्हॉल्व' निघाल्याचे दिसून आले. त्यानंतर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जलवाहिनी फुटून उडणाऱ्या कारंज्यामुळे नागरिकांना ऐन उन्हाळ्यात सुखद गारव्याचा अनुभव मिळाला. मात्र या घटनेमुळे पोरवाल रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळत होते. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एअर व्हॉल्व्ह निघाल्याची शक्यता आहे. आपण स्वतः घटनास्थळी थांबून कर्मचाऱ्यांकडून तत्काळ जलवाहिनीची दुरुस्ती करून घेतल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता नरेश रायकर यांनी दिली. माेठ्या प्रमाणावर पाण्याचे कारंजे उडत असल्याने लहान मुलांनी मनसाेक्त भिजण्याचा अानंद लुटला. पाईपलाईन फुटल्याचे समजताच बघ्यांची माेठ्याप्रमाणावर गर्दी झाली हाेती. येथील दुकानदारांनी पाण्याच्या बादल्या भरुन घेतल्या.

     दरम्यान धानाेरीतील काही भागात पाणी टंचाईमुळे टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत अाहे. त्यात 20 मिनिटांंहून अधिक काळ पाणी वाया गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.  

टॅग्स :PuneपुणेDhanoriधानोरीWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका