शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर पोलीस वसाहतीमध्ये जलवाहिनी फुटली : पोलिसांच्या कुटुंबियांकडून संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:07 IST

शिवाजी नगर पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी अनेकदा पाण्यासाठी आंदोलन केले आहे..

ठळक मुद्देवसाहत पुनर्निर्माण कामादरम्यान वारंवार घटना 

पुणे : शिवाजीनगर पोलीस वसाहतीमध्ये सध्या पुनर्विकासाचे काम सुरू असून या कामादरम्यान वारंवार जलवाहिनी तुटण्याच्या घटना घडत आहेत. बांधकाम व्यावसायिकाच्या अवजड वाहनांमुळे वारंवार पाण्याची गळती होत असून शुक्रवारी सकाळी पुन्हा जलवाहिनी फुटल्याची घटना घडली. मुळातच कमी दाबाने पाणी येत असल्याने हैराण असलेल्या पोलिसांच्या कुटुंबांच्या अडचणीत भर पडली आहे.     पोलिसांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, वसाहतीमध्ये दोन दिवसांपासून अर्धा तास पाणी येत आहे. जलवाहिनी जुनी झाल्याने कमी दाबाने पाणी येते. मुळातच पाणी पुरवठा कमी दाबाने आणि अनियमित होत आहे. त्यातच अशा घडू लागल्याने पोलिसानी ड्युटी वर जायचे का पाणी भरायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून जलवाहिनी दुरुस्त करावी अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबीयांनी केली आहे. शिवाजी नगर पोलीस वसाहतीमध्ये पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून सतावत आहे. येथे राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी अनेकदा पाण्यासाठी आंदोलन केले आहे. मात्र, प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. येथील पोलिसांच्या अडचणी सोडविण्यासाठी पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम एका खासगी बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आले आहे. या कामासाठी सध्या जेसीबी व तत्सम अवजड वाहनांच्या आधारे काम सुरू आहे. मात्र, हे काम सुरू झाल्यापासून वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडत आहेत. सध्या पुण्यात पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. जलसंपदा आणि महापालिकेमध्ये पाण्यावरून वाद सुरू आहेत. त्यातच पाण्याची अशी नासाडी होउ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWaterपाणी