मार्गासनी व केळद पुलावरून पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST2021-07-23T04:09:01+5:302021-07-23T04:09:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मार्गासनी : वेल्हे तालुक्यात बुधवारी आणि गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे साखर, मार्गासनी, पासली ...

मार्गासनी व केळद पुलावरून पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मार्गासनी : वेल्हे तालुक्यात बुधवारी आणि गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे साखर, मार्गासनी, पासली ते केळद आणि माजगाव रस्त्याला जोडणारे पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील ओढे-नाले भातखाचरे यांना नदीचे स्वरूप आले आहे. भात खाताना मध्ये पाणी शिरल्याने भात रोपे पाण्याखाली गेलेली आहेत. त्यामुळे भात शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे.
पासली परिसरात विजेचे खांब रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद होती. परंतु प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वाहतूक पूर्ववत करण्यात आली. तहसीलदार शिवाजी शिंदे साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिवसभर अठरा गाव मावळ बारागाव मावळ पानशेत आदी परिसरात पाहणी केली. केळद वेल्हे रस्त्यावर जाधववाडी येथे दरड कोसळली होती. प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू करून दरड हटवली. दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने तालुक्यात ओढे नाले बंधारे दुथडी भरून वाहत होते. गुंजवणी कानंदी नद्या मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात पाणी आल्याने आसपासच्या शेतजमीन परिसरात पाणी शिरले. मार्गासनी साखर रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक बंद होती. माजगाव या गावाला जोडणारा पुलावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक बंद होती. केळद परिसरात अतिवृष्टीमुळे गावातील घरांच्या भिंती पडले आहेत. तर नुकतेच भात पिके लावली होती पावसाचे पाणी भात पिकात आल्याने भात पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती केळीचे सरपंच रमेश शिंदे यांनी दिली.
फोटो : ओळ माजगाव (ता. वेल्हे) येथील पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद होती.