शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जीबीएस रुग्ण असलेल्या परिसरातील पाणी शुद्ध; शासनाच्या प्रयोगशाळेचा अहवाल प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:47 IST

या परिसरातील पाणी शुद्ध असून, पिण्यास योग्य आहे, असे राज्य शासनाच्या प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे

- हिरा सरवदेपुणे : शहरातील सर्वाधिक गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण असलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याच्या तपासणीचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यात या परिसरातील पाणी शुद्ध असून, पिण्यास योग्य आहे, असे राज्य शासनाच्या प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे. या अहवालामुळे नागरिकांना काहीसा दिला मिळाला आहे. दुसरीकडे शहरातील न्यूरोलॉजिस्ट डाॅक्टरांनी मात्र, हा आजार दूषित पाणी आणि अन्नामुळे होत असल्याचा दावा केल्याने नागरिकांच्या मनातील संशय कल्लोळ बळावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात ‘जीबीएस’ आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी नांदेड येथील विहीर व अन्य ठिकाणची पाहणी केली होती. तसेच धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नऱ्हे, नांदेड या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांमधील पाण्याचे नमुने तपासण्याचे व ते राज्य शासनाच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे महापालिकेने ११ ठिकाणचे पाण्याचे प्रत्येकी १०० मिलिलिटर पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पुणे महापालिकेला प्राप्त झाला आहे.

या अहवालानुसार किरकटवाडी येथील भैरवनाथनगर, उज्ज्वल निसर्ग सोसायटी, पंढरी निवास, ठकूबाई हगवणे निवास, आर. ओ. फिल्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन जवळ, सोनवणेवस्ती, नानानगर, डीएसके विश्व जवळील जलकुंभ या सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य आहे, तर कानडे इस्टेट नांदेड येथील विहिरीत साेडलेल्या खडकवासला धरणातून येणाऱ्या पाण्यात कोलीफॉर्म्स, थरमोटॉलरंट आणि ई कोलाय हे जिवाणू आढळून आल्याने हे पिण्यास योग्य नाही, मात्र, ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर हे पाणी पिण्यास योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

शासनाच्या अहवालानुसार महापालिकेच्या पाणवठ्यावरील पाणी शुद्ध असल्याचे नमूद केले आहे. तसेच महापालिकेने २७ ठिकाणांचे पाण्याचे नमुने घेतले होते, तेथील पाणी पिण्यास योग्य असल्याचेही महापालिकेच्या प्रयोगशाळेने कळविले आहे.  - रामदास तारू, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिकाजीबीएस आजार ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. हा आजार दूषित पाणी व अन्नामुळे होऊ शकतो. ही स्थिती अचानक विकसित होऊ शकते आणि चार आठवड्यांपर्यंत वाढू शकते. या संसर्गामुळे जुलाब आणि पोटदुखी यासारखी लक्षणेदेखील होऊ शकतात. मात्र योग्य उपचारांनी हा बरा होऊ शकतो. - डॉ. परेश बाबेल, न्यूरोलॉजिस्ट

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणwater transportजलवाहतूकMuncipal Corporationनगर पालिका