शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

फ्लॅटमागे आकारणार २० हजारांचा ‘वॉटर फंड’ : किरण गित्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 20:47 IST

रिंगरोड क्षेत्रात होणाऱ्या अकरा टाऊनशिप आणि खासगी व्यावसायिक इमारतीमध्ये पाण्याचा व्यवस्था करावी लागणार आहे.

ठळक मुद्दे वाढत्या पाण्याचा प्रश्नावर विकसकासाठी असणार अटवढू बंधाऱ्यातून उचलणार ५ एमएलडी पाणी

पुणे : पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात नवीन बांधकाम परवानगी घेताना त्या सदनिकेतील प्रत्येक फ्लॅटमागे विकासकाला २० हजार रूपयांचा ‘वॉटर फंड’ जमा करावा लागणार आहे,असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पुणे शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. अनेक नवनवीन बांधकामे, इमारती या उभारल्या जात आहे. राज्याच्या वेगवेगळ्या तसेच परराज्यातून अनेक नागरिक तसेच उद्योग व्यावसायिक येत आहे. या नागरिक आणि उद्योगांसाठी लागणाऱ्या पाण्याचा विचार आपल्याला करावा लागेल. त्यासाठी नव्याने त्याची तरतुद तसेच आर्थिक मदत उभी करावी लागणार आहे. त्यामुळे रिंगरोड क्षेत्रात होणाऱ्या अकरा टाऊनशिप आणि खासगी व्यावसायिक इमारतीमध्ये पाण्याचा व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी आपण प्रत्येक खासगी विकसकांकडून प्रत्येक फ्लॅट मागे एकरकमी २० हजार रूपयांचा ‘वॉटर फंड’ आकारण्यात येणार असल्याचे किरण गित्ते यांनी सांगितले.पीएमआरडीए हद्दीतील नागरिकांना पाणीपुरवठा सुरुळीत व्हावा, यासाठी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. वाघोली आणि पिरंगुट परिसरातील पाच गावांसाठी पाणीपुरवठ्याचे प्रकल्प बांधले जाणार आहे. या फंडातून प्राधिकरणाच्या हद्दीत पाणीपुरवठा योजना सुरू केली जाणार आहे. ज्या ठिकाणी पाणीपुरवठा प्रकल्प केला जाणार आहे. पीएमआरडीएच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर नागरिकरण होत आहे. या भागामध्ये नागरिकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीला शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांकडून पाणी व्यवस्थित मिळत नसल्याची तक्रार येत आहेत. पीएमआरडीएच्या हद्दीतील बांधकामांना परवानगी देताना संबधित प्रकल्पाला पाणी उपलब्ध असल्याचे अथवा पाणीपुरवठ्याची सोय असल्याचे प्रमाणपत्र संबधित ग्रामपंचायतींकडून दिले जाते. हे पत्र पीएमआरडीए ग्राह्य धरते. कालांतराने या ठिकाणी पाणीपुरवठा सुरुळीत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होतात.पिरंगुट, सूस, म्हाळुंगे, बावधन आणि भूगाव या पाच गावातील नागरिकांसाठी सुमारे २०० कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना केली जाणार आहे. विविध ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी प्रकल्प हाती घेतल्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे गित्ते यांनी सांगितले. चौकटवढू बंधाऱ्यातून उचलणार ५ एमएलडी पाणीपीएमआरडीएने पाणीपुरवठ्याच्या योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाघोली येथील सुमारे तीन लाख नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी येथे ५ एमएलडी इतक्या क्षमतेचा प्रकल्प बांधला जाणार आहे. हे पाणी शिरूर तालुक्यातील वढू येथील बंधाºयातून घेतले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेKiran Gitteकिरण गित्तेPMRDAपीएमआरडीएWaterपाणी