पाण्यासाठी वाद पेटणार

By Admin | Updated: July 26, 2014 00:32 IST2014-07-26T00:32:28+5:302014-07-26T00:32:28+5:30

खडकवासला धरणातून इंदापूर आणि दौंड या तालुक्यांसाठी सोडल्या जाणा:या पाण्यामुळे पुन्हा एकदा शहरी आणि ग्रामीण, असा वाद चव्हाटय़ावर येऊ पाहत आहे.

Water disputes | पाण्यासाठी वाद पेटणार

पाण्यासाठी वाद पेटणार

पुणो : खडकवासला धरणातून इंदापूर आणि दौंड या तालुक्यांसाठी सोडल्या जाणा:या पाण्यामुळे पुन्हा एकदा शहरी आणि ग्रामीण, असा वाद चव्हाटय़ावर येऊ पाहत आहे. पाणी केवळ पिण्यासाठीच वापरले जाईल, असा प्रशासनाचा दावा आहे. पुण्यासाठी सहा महिन्यांचे पाणी राखीव ठेवून या तालुक्यांना दीर्घ काळ पुरेल इतका पाणीसाठा सोडण्यामागे आगामी निवडणुका हे कारण असल्याचे बोलले जात आहे.
शेतीसाठी, कारखान्यांसाठी होणारी पाणीचोरी, कालव्यातील पाणीगळती रोखण्यासाठीची यंत्रणा निष्क्रिय असल्याने या पाण्यापैकी किती पाणी निव्वळ पिण्यासाठी वापरले जाईल, याविषयी शंका उपस्थित होत आहेत.
दौंड आणि इंदापूर नगर परिषदेने तसेच 2क् ग्रामपंचायतींनी केलेल्या मागणीवरून दीड अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी खडकवासला धरणातून सोडले जाणार आहे. दौंड आणि इंदापूर नगर परिषदेच्या नळपाणी पुरवठा योजनांसाठी 6 तलाव भरले जाणार असून, 15 दिवस दररोज 9क्क् ते 1क्क्क् क्युसेक्स क्षमतेने हे पाणी सोडले जाईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज स्पष्ट केले.
खडकवासला प्रकल्पात 1क् टीएमसी पाणीसाठा झाल्याने आणि हा साठा 35 टक्के असल्याने दौंड व इंदापूरसाठी पाणी दिल्यानंतरही पुण्यासाठी साडेआठ टीएमसी पाणी शिल्लक राहील. त्यामुळे पालिका आयुक्तांसोबत, तसेच जलसंपदा विभागाच्या अधिका:यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, असा दावा राव यांनी केला.
 या दोन्ही नगर परिषदांच्या हद्दीतील तसेच ग्रामपंचायतींच्या क्षेत्रतील लोकसंख्येचे प्रमाण पाहता, दीड टीएमसी पाणी अनेक महिने पुरू शकेल. खडकवासला धरणातील पाण्याचा 75 टक्के भाग या दोन तालुक्यांमधील निमशहरी भागासाठी सोडला जाणार आहे. 
 सबंध जून महिना पावसाअभावी कोरडा गेल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. पाणीटंचाईमुळे पाऊण अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचे धोरण पालिकेला राबवावे लागले. अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी मिळाल्याने नागरिकांवर प्लॅस्टिकच्या कॅनमधून अन्य ठिकाणांवरून पाणी आणण्याची वेळ आली. सुदैवाने गेल्या 1क् दिवसांमध्ये पाऊस होऊन धरणो 35 टक्क्यांर्पयत भरली. यामुळे रोज पाणी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला. असे असतानाच पश्चिम जिल्हय़ात पावसाचे प्रमाण एकदम कमी झाले. त्यामुळे अद्यापही पुणोकरांमध्ये पाण्याविषयी चिंता आहेत.  दौंड, इंदापूर नगर परिषदांच्या हद्दीतील आणि 2क् ग्रामपंचायतींच्या हद्दीतील लोकसंख्या, त्यांना दरमहा आवश्यक असणारे पाणी आणि दीड टीएमसी पाण्यामुळे या भागासाठी होणारा जलसाठा यांचे कोणतेही गणित प्रशासनाकडे नसताना नगर परिषदांच्या हद्दीतील पाणी केवळ पिण्यासाठी वापरले जाईल, हा प्रशासनाचा दावा 
धादांत खोटा असल्याचे जाणकारांचे मत आहे.    (प्रतिनिधी)
 
पुण्याचे पाणी पळवू नका : सजग नागरिक मंच 
शेतीसाठी हे पाणी पळवू नये, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. हे पाणी कालव्यातून सोडण्यात आल्यानंतर कालव्यास असलेल्या गळतीमुळे ते इंदापूर-दौंडसाठी किती पोहोचेल, याबाबत शंका आहे. तसेच, कालव्यातून अनेक ठिकाणी मोटारींद्वारे पाणी शेतीसाठी खेचले जात असल्याने जिल्हा प्रशासनाने आधी त्यावर नियंत्रण आणावे तसेच पोलीस बंदोबस्तात हे पाणी सोडले जावे, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे. पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही; मात्र त्याआडून शेतीसाठी पुणोकरांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणू नये, असेही ते म्हणाले. 
 
पिण्यासाठी विरोध नाही; मात्र शहराकडेही लक्ष द्यावे
शहरातील नागरिकांबरोबरच ग्रामीण भागास पाणी पिण्यासाठी देण्यास आमचा विरोध नाही; मात्र तूर्तास हे पाणी शहर आणि शेतीसाठी दिले गेल्यास शहरात पुढील वर्षात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होईल. त्यामुळे याबाबत पाटबंधारे विभाग आणि महापालिकेकडून एकत्र बसून तोडगा काढला जाईल. मात्र, आधी शहरासाठी पिण्याच्या पाण्याचाच विचार करणो योग्य राहील.
- चंचला कोद्रे, महापौर 
 
त्यांनीही काटकसरीने वापरावे
गावांना पाणी देण्यास आमचा विरोध नाही; मात्र धरणात पाणी नसताना शेतीसाठी मनमानी पाणी देणो योग्य होणार नाही. महापालिकेने काटकसर करून पाणी वाचविले आहे. त्यामुळे ज्या गावांना हे पाणी देण्यात येत आहे, त्यांनाही ते काटकसरीने वापरण्यासाठी बंधने घालावीत. धरणांचा साठा पाहता, पिण्यासाठी प्राधान्य देणो गरजेचे आहे; शेतीसाठी नाही. मात्र, शेतीही आवश्यक असल्याने ते मनमानी पद्धतीने जात असेल, तर त्याला विरोध केला जाईल.- अरविंद शिंदे , विरोधी पक्षनेते

 

Web Title: Water disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.