कात्रज, सिंहगड रस्ता परिसरात गुरुवारी पाणी बंद
By Admin | Updated: February 10, 2015 01:33 IST2015-02-10T01:33:07+5:302015-02-10T01:33:07+5:30
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वडगाव जलकेंद्र, केदारेश्वर पंपिंग स्टेशन तसेच कात्रज आगम मंदिर पंपिंग स्टेशनच्या देखभाल

कात्रज, सिंहगड रस्ता परिसरात गुरुवारी पाणी बंद
पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वडगाव जलकेंद्र, केदारेश्वर पंपिंग स्टेशन तसेच कात्रज आगम मंदिर पंपिंग स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी (दि. १२) रोजी करण्यात येणार आहे.
त्यामुळे या दिवशी कात्रज तसेच सिंहगड रस्ता परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिरा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.