शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिल्हेवाडी धरणातील पाणी जुन्नरसाठीच : आमदार अतुल बेनके यांचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:47 IST

चिल्हेवाडी धरणात उपलब्ध होणारे पाण्याचा हक्क हा जुन्नर तालुक्यासाठीच राहणार आहे.

नारायणगाव :- चिल्हेवाडी धरणातील पाणी अहमदनगर येथील अकोले व संगमनेर येथे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे ही अफवा असून पूर्णपणे खोडसाळ व निराधार बाब आहे. धरणातील पाणी हे फक्त जुन्नर तालुक्यासाठीच सिंचन व पिण्यासाठी राखीव आहे अशी माहिती जुन्नरचेआमदार अतुल बेनके यांनी दिली.काही प्रसार माध्यमांद्वारे चिल्हेवाडी धरणातील पाणी हे केंद्र सरकारच्या नदी जोड प्रकल्प व राज्य सरकारच्या उपसा जलसिंचन योजने अंतर्गत अकोले व संगमनेर येथे नेण्याचे प्रयत्न सुरू असून यासाठी काही संघटनांनी पाठपुरावा सुरू केला आहे. याचा खुलासा करताना आमदार अतुल बेनके म्हणाले, चिल्हेवाडी धरणात उपलब्ध होणारे पाण्याचा हक्क हा जुन्नर तालुक्यासाठीच राहणार आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेली चर्चा ही निराधार असून यास कोणताही आधार नाही अशा प्रकारे पाणी नेण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर झालेला नसून काही जणांनी हा मुद्दा जाणीवपूर्वक प्रसार माध्यमांद्वारे केला आहे. सध्या चिल्हेवाडी धरणातून पाईपलाईनचे काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर या धरणाचा लाभ पुर्व पट्टयातील अनेक गावांना होवून तो भाग सुजलाम सुफलाम होणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता चिल्हेवाडीचे पाणी जुन्नर तालुक्यासाठीच राहील असा विश्वास बेनके यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, डिंभे धरण विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी माने यांनी अधिक्षक अभियंता यांना दि.५ सप्टेंबर २०२० रोजी पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या नदी जोड प्रकल्प अथवा उपसा सिंचन योजनेद्वारे, नदी जोड प्रकल्पाद्वारे, चिल्हेवाडी धरणाचे पाणी अहमदनगर जिल्हयातील अकोले व संगमनेर तालुक्यात २३ गावांना देण्याबाबत कारवाई सुरू असल्याचे वाचणात आले परंतु याविषयी या विभागास शासन स्तरावरून कोणतीही मागणी अथवा पत्र तसेच संबंधित कमिटी अथवा लोकप्रतिनिधींकडून मागणी करण्यात आलेली नाही. चिल्हेवाडी धरणाची साठवणुक क्षमता ०.९० टी.एम.सी.आहे. या धरणातून सुरू असलेल्या बंधिस्त पाईपलाईनची लांबी ३८.०८० कि.मी.-इतकी असून जुन्नर तालुक्यातील अवर्शण प्रवण गावातील ६ हजार ३७२ हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी पुर्णपणे नियोजन झालेले आहे. चिल्हेवाडी धरणात कोणतेही अतिरीक्त पाणी उपलब्ध नाही, जर भविश्यात पाणी उपलब्ध झाल्यास शासनाच्या निर्देशानुसार इतर योजनांना पाणी देणे शक्य होईल.

टॅग्स :Junnarजुन्नरWaterपाणीMLAआमदार