बारामती शहराला आजपासून दिवसाआड पाणी
By Admin | Updated: October 30, 2014 22:59 IST2014-10-30T22:59:48+5:302014-10-30T22:59:48+5:30
शहरास सध्या निरा डावा कालवा उद्भवावरील योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता निरा डावा कालवा प्रवाह बंद झाला आहे.

बारामती शहराला आजपासून दिवसाआड पाणी
बारामती : शहरास सध्या निरा डावा कालवा उद्भवावरील योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता निरा डावा कालवा प्रवाह बंद झाला आहे. या कालावधीत उपलब्ध पाणीसाठय़ाचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नगरपालीकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील सिनेमारोड, कचेरीरोड, पानगल्ली, सटवाजीनगर, नेवसेरोड, इंदापूररोड, मार्केटयार्ड रोड, संपुर्ण आमराई, हंबीरबोळ, हरिकृपानगर, सिद्धेश्वरगल्ली, महावीर पथ, शंकरभोई तालीम परिसर, बुरूडगल्ली, साईगणोशनगर, मयुरेश्वर अर्पाटमेंट ,आनंदनगर, अशोकनगर, अकल्पित हौसिंग सोसायटी, विजयनगर, पोस्टरोड, तावरे बंगला परिसर, विश्रम सोसायटी, जवाहरनगर येथे शुक्रवार (दि. 31) पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
दि. 1 नोंव्हेंबर पासून विवेकानंद, अवधूतनगर, वसंतनगर, व्हीलकॉलनी, ािश्चन कॉलनी, सद्गुरूनगर, पतंशानगर, महादेवमळा, क्षत्रियनगर, श्रवणगल्ली, कोष्टीगल्ली, मारवाडपेठ, गोकुळवाडी, मेडदवाडी तसेच संपूर्ण कसबा भागाला एकदिवसाआड पाणीपुरवठा बंद राहिल.
या कालवा प्रवाह बंद कालावधीत साठवण तलावात पाणी साठवुन ते शहरास पुरविले जाते. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरावे. तसेच तोटय़ा नसलेले नळ जोडणीला तोटय़ा बसवाव्यात.फिल्टर पाण्याचा अपव्यय टाळावा.निरा डाव्या कालव्यामधून पाणी उपलब्ध झाल्यानंतर त्वरित नियमित पाणीपुरवठा ेके ला जाणार आहे.बारामती नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी दिपक ङिांझाड,पाणीपुरवठा समितीच्या सभापती पौर्णिमा तावरे यांनी सहकार्याचे आवाहन केले आहे.