बारामती शहराला दोन दिवसांनी पाणी!
By Admin | Updated: July 12, 2014 22:20 IST2014-07-12T22:20:35+5:302014-07-12T22:20:35+5:30
पावसाळा सुरू होऊनदेखील अद्याप वीर, भाटघर धरण क्षेत्रत पाऊस नाही. त्यामुळे संपूर्ण शहरास शनिवार (दि. 12) पासूनच दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

बारामती शहराला दोन दिवसांनी पाणी!
बारामती : पावसाळा सुरू होऊनदेखील अद्याप वीर, भाटघर धरण क्षेत्रत पाऊस नाही. त्यामुळे संपूर्ण शहरास शनिवार (दि. 12) पासूनच दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणांतील राखीव साठय़ातून 25 जुलैला बारामतीच्या तलावात पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे.
शहरातील सिनेमा रोड, कचेरी रोड, पानगल्ली, सटवाजीनगर, नेवसे रोड, इंदापूर रोड, मार्केट यार्ड रोड, संपूर्ण आमराई, हंबीर बोळ, हरिकृपानगर, सिद्धेवर गल्ली, महावीर पथ, शंकर भोई तालीम परिसर, बुरुड गल्ली, तसेच साई गणोशनगर, मयूरेश्वर अपार्टमेंट, आनंदनगर, अशोकनगर, अकल्पीत हौसिंग सोसायटी, विजयनगर, पोस्ट रोड, तावरे बंगला परिसर, विश्रम सोसायटी, जवाहरनगर या विभागांना दर दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा होणार आहे. संपूर्ण कसबा विभाग, विद्या हौसिंग सोसायटी, विवेकानंदनगर, अवधूतनगर, वसंतनगर, व्हील कॉलनी, ख्रिश्चन कॉलनी, सद्गुरुनगर, पतंगशहानगर, महादेव मळा, क्षत्रीयनगर, श्रवणगल्ली, कोष्टीगल्ली, मारवाड पेठ, गोकूळवाडी, मेडद रोड याठिकाणी दर दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा होणार आहे.
नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे. तोटय़ा असलेल्या नळ जोडाला तोटय़ा बसवाव्यात. नीरा डाव्या कालव्यामधून पाणी उपलब्ध झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षा जयश्री सातव, मुख्याधिकारी रवी पवार आणि पाणीपुरवठा समितीच्या सभापती पौर्णिमा तावरे
यांनी दिले आहे.
दौंड शहराला दिवसाआड पाणी
दौंड : दौंडला पाणीपुरवठा करणा:या तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे एक आठवडा पुरेल एवढाच जेमतेम पाणीसाठा आहे. तेव्हा सोमवार (दि. 14) पासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
तसेच, पाऊस लांबल्यास दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. परिणामी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी केले आहे. नानवीज, गोपाळवाडी, लिंगाळी, सोनवडी, राज्य राखीव पोलीस बल 5 आणि 7 यांचा पाणीपुरवठा सोमवार (दि. 30) पासून बंद करण्यात आला आहे.