शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

रातराणीवर राहणार वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 04:02 IST

पीएमपी सुरक्षा विभाग : गस्तीवरील पोलीसही ठेवणार लक्ष

पुणे : रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या रातराणी बससेवेवर करडी नजर ठेवली जाणार आहे. पीएमपीच्या सुरक्षा विभागाच्या पथकासह तिकीट तपासनिसांचे पथक आणि रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांचेही या बसवर लक्ष राहील.शहरात प्रामुख्याने पुणे स्टेशन, स्वारगेट, हडपसर, कात्रज या भागात बाहेरगावाहून येणाºया प्रवाशांची संख्या जास्त असते. पीएमपीची सर्वसाधारण सेवा रात्री साडेअकरापर्यंत असते. त्यानंतर प्रवाशांना रिक्षा किंवा इतर खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. हे टाळण्यासाठी पीएमपीने काही वर्षांपासून रातराणी बससेवा सुरू केली आहे. सध्या ६ मार्गांवर ही सेवा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी रातराणी बसमध्ये चालक व वाहकाने प्रवाशांशी उद्धट वर्तन केल्याचा प्रकार घडला होता. याची पीएमपी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित चालक व वाहकावर कारवाई केली. तसेच, रातराणी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.‘पीएमपी’मध्ये एकूण २० तिकीट तपासनिसांची पथके आहेत. तसेच सुरक्षा पथकही आहे. ही पथके रात्री तिकीट तपासणीबरोबरच बसमधील प्रवाशांना येणाºया अडचणींवरही लक्ष केंद्रित करणार आहेत. सर्व पथकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांकडून शहरात गस्त घातली जाते. त्यांनी रातराणी बसच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याबाबतही पोलिसांशी चर्चा झाली आहे, अशी माहिती ‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिली.चालक-वाहकांचीच जबाबदारीबसमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर पुरूष प्रवासी बसू न देण्याची जबाबदारी वाहकांचीच आहे. या जागांवर पुरूष प्रवासी बसलेले असतील आणि महिला प्रवासी उभ्या असतील, तर वाहकांनी महिलांना जागा करून देणे आवश्यक आहे. त्याबाबत वाहक व चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, तिकीट तपासनिसांच्या पथकांना याबाबत सांगण्यात आल्याचे गुंडे यांनी नमूद केले.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणे