सीसीटीव्हीचा ठाण्यावर वॉच
By Admin | Updated: August 20, 2014 23:52 IST2014-08-20T23:52:45+5:302014-08-20T23:52:45+5:30
स्वप्नाली लाडबाबत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर अशी घटना पुन्हा घडू नये, म्हणून आता शहरात सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना पुढे आली आहे.

सीसीटीव्हीचा ठाण्यावर वॉच
ठाणो : स्वप्नाली लाडबाबत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर अशी घटना पुन्हा घडू नये, म्हणून आता शहरात सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना पुढे आली आहे.
ठाणो महापालिकेकडे आलेल्या प्रस्तावानुसार शहरात एलईडी दिव्यांवरच आता ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानुसार, मागील सात महिने महापालिकेच्या विद्युत विभागाकडे पडून असलेल्या प्रस्तावाच्या निविदांचे काम येत्या दोन दिवसांत अंतिम करण्याचे आदेश महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत.
बुधवारी झालेल्या महासभेत स्वप्नालीचे प्राण वाचवणा:या नगरसेविका उषा भोईर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शहरात पुन्हा अशी घटना घडू नये, म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी सभागृहात लावून धरली. नगरसेवक अशोक वैती यांनी नगरसेवक निधीतून अथवा प्रभाग, मागसवर्गीय निधीतून अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवता येऊ शकतात का, असा सवाल प्रशासनाला केला. रामभाऊ तायडे यांनी आपले एक महिन्याचे मानधन स्वप्नालीच्या उपाचारासाठी देण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, नगरसेवक निधी अथवा इतर निधीतून अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवता येत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यावर, काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी महापालिकेच्या विद्युत विभागाकडे सव्वा वर्षापासून पडून असलेल्या एका प्रस्तावाची आठवण करून दिली. या प्रस्तावानुसार एक एजन्सी महापालिका हद्दीत मोफत एलईडी दिवे बसवून देणार आहे. यामध्ये दिवे, पोल आणि सीसीटीव्ही कॅमे:यांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या दिव्यांपोटी महापालिकेच्या विजेच्या बिलात 7क् टक्क्यांची बचत होणार असून या बचतीपोटी मिळणारे अर्धे उत्पन्न संबंधित एजन्सी पालिकेला देणार आहे, तर अर्धी रक्कम स्वत:कडे ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानुसार, या प्रस्तावाचा का विचार केला जात नाही, असा सवालही त्यांनी केला. यावर, विद्युत विभागाचे प्रमुख सुनील पोटे यांनी आयुक्तांशी चर्चा करून यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली. परंतु, येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने यावर तत्काळ निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. त्यानुसार, यासंदर्भातील निविदा काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
सात महिने उलटूनही निविदा अंतिम का झाल्या नाहीत, असा सवाल नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला. अखेर, महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी येत्या दोन दिवसांत या कामाच्या निविदा अंतिम करून कामाला सुरुवात करावी, असे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार, आता येत्या काही काळात शहरातील प्रत्येक एलईडी दिव्यावर सीसीटीव्ही कॅमेरे दिसणार आहेत. एलईडी दिव्यांचा प्रकाश चांगल्या दर्जाचा असल्याने सकाळी आणि रात्रीच्या वेळेसही त्यावर लावण्यात येणा:या सीसीटीव्हींची चोख नजर येणा:या-जाणा:या प्रत्येकावर रोखली जाणार आहे. यामुळे ठाण्यातील गुन्हे कमी होतील अशी आशा करायला हरकत नाही. (प्रतिनिधी)
1सोडियम व्हेपरची क्षमता 16 हजार तास एवढी असून एलईडी दिव्यांची क्षमता 6क् हजार तासांची आहे. सोडियम व्हेपर दिव्याचे आयुर्मान 1क् वर्षे असून एलईडी दिव्याचे आयुर्मान 25 वर्षे एवढे आहे.
2सध्या बसवण्यात आलेल्या एलईडी दिव्यांमुळे महापालिकेने 2क्13-14 या वर्षात 3.2 कोटींच्या बिजेची बचत झाली आहे.
3पहिला पायलेट प्रोजेक्ट राबवला गेला. यामध्ये स्टेशन परिसर, मासुंदा तलाव, राममारुती रोड, मार्केट आदी भागांत 31क् दिवे बसवण्यात आले.
च्महापालिका हद्दीत आजघडीला 33 हजार दिवे आहेत. यापैकी 55क्क् दिवे महापालिकेने बदलले असून उर्वरित दिवे मोफत बसवण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. खाजगी संस्थेच्या माध्यमातून मोफत दिवे बसवले जाणार असून त्यांची निगा आणि देखभाल त्याच संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
च्सध्या फिजिकली हे शक्य नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. एलईडी आणि सीसीटीव्ही ही वेगळी टेक्नॉलॉजी असल्याने सध्या तरी ही बाब शक्य नाही. ही सदस्यांनी केलेली मागणी असून तशा स्वरूपाचा कोणताही प्रस्ताव सध्या प्रशासनाला प्राप्त झालेला नसल्याचेही विद्युत विभागाने स्पष्ट केले आहे.