कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास
By Admin | Updated: January 23, 2017 03:15 IST2017-01-23T03:15:42+5:302017-01-23T03:15:42+5:30
औंध येथील न्यू डीपी रोडवर अमेय सहकारी गृहरचना संस्थेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, पालिका

कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास
औंध : औंध येथील न्यू डीपी रोडवर अमेय सहकारी गृहरचना संस्थेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, पालिका प्रशासन त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. यामुळे गंभीर रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पालिका प्रशासनाने गांभीर्याने त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीने येथील अनेक सोसायट्यांतील नागरिक त्रासले आहेत.
बहुतांश कचरा ओला असल्याने थोड्याच वेळात दुर्गंधी पसरते. त्यामुळे डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रस्त्यावरून ये-जा करताना नाक दाबल्याशिवाय नागरिकांना जात येत नाही, अशी अवस्था झाली आहे.
कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे; त्याचा अतोनात त्रास परिसरात राहणाऱ्या लोकांना होतो.
या संदर्भात महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. कचरा रोजच्या रोज उचलून नेण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
(वार्ताहर)