शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या दुतर्फा कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:02 IST

भीमा-भामा नदी परिसर : गावांत कचरा उचलण्याची यंत्रणा असूनही रस्त्यावरच साचतोय ढीग

शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील शेलपिंपळगाव व शेलगाव हद्दीत भीमा-भामा नदीलगत मोठ्या प्रमाणात कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे शेलपिंपळगाव व शेलगाव ग्रामपंचायतीने आपापल्या हद्दीत कृपया येथे कचरा टाकू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सूचनाफलक लावले आहेत. मात्र याच दोन्ही फलकांसमोर रात्रीच्या वेळी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याचे विद्रूपीकरण होत असून प्रवाशांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. गावात कचरा उचलण्याची योग्य व्यवस्था असतानाही केवळ ग्रामस्थांच्या आडमुठेपणामुळे कचºयाचे ढीग दिवसागणिक वाढत चालले आहेत.

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेलपिंपळगाव, शेलगाव ही महत्त्वपूर्ण गावे आहेत. वाढत्या विकासामुळे गावच्या परिसरात नागरिकीकरण वाढत चालले आहे. परिणामी उत्पन्नाचे साधन म्हणून अनेकांनी भाड्यासाठी खोल्या बांधल्या आहेत. त्यामुळे दोन्ही गावात रहिवासीसंख्याही वाढत असून त्याबरोबर कचºयाचे प्रमाणही वाढत आहे. कचरा व्यवस्थापन व्हावे, यासाठी शेलपिंपळगाव ग्रामपंचायतीकडून घंटागाडीद्वारे कचरा गोळा केला जात आहे. परंतु गावात कचरा गोळा करण्याची व्यवस्था असतानादेखील नागरिकांकडून रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे.त्यामुळे चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील भीमा नदीवरील पुलाच्या दुतर्फा कचºयाचे ढीग साचत आहेत. यामध्ये प्लॅस्टिक कचरा, हॉटेलमधील शिळे खाद्यपदार्थ, कापलेले केस, सडलेला कांदा, खराब पालेभाज्या यांचा समावेश आहे.परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून स्थानिक नागरिकांना आणि प्रवाशांना नाक दाबून मार्गस्थ व्हावे लागत आहे. गावात कचरा व्यवस्थापन करण्यासाठी सुविधा असतानादेखील रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने सरपंच विद्या मोहिते व शेलगावचे सरपंच नागेश आवटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सरपंच विद्या मोहिते म्हणाल्या, की हॉटेल व्यावसायिक व रस्त्यावरून येणाºया-जाणाºया बाहेरच्या वाहनांतून या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेGarbage Disposal Issueकचरा प्रश्न