लाखो लिटर पाणी वाया

By Admin | Updated: March 16, 2015 04:18 IST2015-03-16T04:18:10+5:302015-03-16T04:18:10+5:30

बारामती एमआयडीसीला उजनी जलाशयातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीमधून लाखो लिटर पाणी वाया

Wast millions of liters of water | लाखो लिटर पाणी वाया

लाखो लिटर पाणी वाया

बारामती : बारामती एमआयडीसीला उजनी जलाशयातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. उन्हाळ्यात दिवसेंदिवस उजनी जलाशयाची पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे एमआयडीसीतील उद्योगांवर होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यातच वाया जाणाऱ्या पाण्यामुळे उद्योजकांनी संताप व्यक्त केला आहे.
भिगवणपासून काही अंतरावर असणारी जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे फवारे रस्त्यावर सुरू होते. रविवारी (दि. १५) दिवसभर हे पाणी सुरूच होते. उजनी जलाशयातून बारामती एमआयडीसीतील उद्योगांना पाणीपुरवठा होतो.
उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनी जलशयातील पाणीपातळी खालावत आहे. त्यातच जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे उद्योजकांनी संताप व्यक्त केला आहे. अक्षरश: जलवाहिनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्याचा वाहने धुण्यासाठी रविवारी वापर सुरू होता. यासाठी वाहनांच्या रांगा लागत होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Wast millions of liters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.