वनाधिकाऱ्याविरूद्ध वॉरंटचे आदेश
By Admin | Updated: August 15, 2014 00:40 IST2014-08-15T00:40:01+5:302014-08-15T00:40:01+5:30
वृक्षतोडीच्या घटनांसंदर्भातील सुनावणीच्या तारखांना गैरहजर राहणाऱ्या महापालिकेच्या वन अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसांना वॉरंट काढण्याचा आदेश पश्चिम विभागाचे हरित न्यायाधीकरणाने दिला.

वनाधिकाऱ्याविरूद्ध वॉरंटचे आदेश
पुणे : वृक्षतोडीच्या घटनांसंदर्भातील सुनावणीच्या तारखांना गैरहजर राहणाऱ्या महापालिकेच्या वन अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसांना
वॉरंट काढण्याचा आदेश पश्चिम विभागाचे हरित न्यायाधीकरणाने दिला.
न्या. व्ही. आर. किंगावकर आणि सदस्य अजय ए. देशपांडे यांच्या खंडपीठाने वनअधिकारी मोहन ढेरे यांच्याविरुद्ध हा आदेश दिला आहे. पर्यावरण कार्यकर्ते विनोद जैन यांनी मुंढवा-घोरपडे रस्त्यावरील महापालिकेने बेकायदेशीररीत्या वृक्षतोडीसंदर्भात या न्यायाधीकरणासमोर याचिका दाखल केली आहे. या संदर्भातील सुनावण्यांना ढेरे हे बऱ्याचदा अनुपस्थित राहिले आहेत.
न्यायाधीकरणाने निरीक्षण नोंदवत सांगितले, ‘‘महापालिकेच्या बेजबाबदार वृत्तीला पाहून आम्हाला अतिशय दु:ख होत आहे. बेजबाबदार व्यक्तीला या सुनावण्यांना उपस्थित राहण्यास नेमण्यात आले आहे. घटनेबाबत त्याला कसलेही ज्ञान नाही. त्यांच्या वतीने वकीलही सुनावणीला उपस्थित राहू शकलेला नाही. या सगळ्या परिस्थितीत, खंडपीठ मोहन ढेरे याच्याविरुद्ध २० हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट काढण्याचे निर्देश देतो. हा वॉरंट डीसीपीच्या माध्यमातून देण्यात यावा.’’ (प्रतिनिधी)