सिडनी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा
By Admin | Updated: December 16, 2014 04:16 IST2014-12-16T04:16:32+5:302014-12-16T04:16:32+5:30
आॅस्टे्रलियामधील सिडनी शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह पुण्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सिडनी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा
पुणे : आॅस्टे्रलियामधील सिडनी शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह पुण्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहर पोलिसांना दक्षतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शहरातील संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली.
सिडनीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा मुंबईवर झालेल्या हल्ल्याशी साधर्म्य साधणारा आहे. दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्यांमध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हॉटेल, लॉजेस, संशयित व्यक्तींची तपासणी सुरु करण्यात आली आहे. तसेच वाहन तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे.
पुण्याबरोबरच देशातील महत्त्वाच्या शहरांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद तसेच बंगळुरू या शहरांचा यामध्ये समावेश
आहे. (प्रतिनिधी)