दूध दरवाढीसाठी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:09 IST2021-06-20T04:09:31+5:302021-06-20T04:09:31+5:30
शेतकरी पशुपालन करून शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करत असतात परंतु दूध खरेदी करणाऱ्या डेअरी व संघांनी ग्राहकांसाठी विक्रीचे ...

दूध दरवाढीसाठी आंदोलनाचा इशारा
शेतकरी पशुपालन करून शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करत असतात परंतु दूध खरेदी करणाऱ्या डेअरी व संघांनी ग्राहकांसाठी विक्रीचे दर व दूध उत्पादक यांच्याकडून मिळणाऱ्या दरामध्ये मोठी तफावत आहे. शासनाने या बाबत चौकशी करून संबंधित त्यावर कारवाई करावी या बाबतचे पत्र तहसीलदार लैला शेख यांना दिले आहे.
चारा, पशु खाद्य दवाखान्याचा खर्च भरमसाठ वाढलेला आहे. दूध डेरी चे ऑडिट करून दुधाची मागणी किती या बाबतचे चौकशी करून शेतकऱ्यांची होणारे लुटमार शासनाने थांबवावी. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३५ रुपये दर सुरू करावा. साखर कारखाना प्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभाव एफ आर पी नुसार दर द्यावा ग्राहकांना शुद्ध व रास्त दूध दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या अशी मागणी गिरी यांनी केलेली आहे. यावेळी किसान युवा क्रांती संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष दशरथ गिरी, उपाध्यक्ष संभाजी कांडगे दादासाहेब बुळे, नवनाथ रणदिवे रणदिवे उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १९रांजणगाव सांडस दूध दरवाढ
फोटो ओळ : किसान युवा क्रांती संघटना वतीने शिरूर तहसील तहसिलदार शेख यांना दुधदर वाढीसाठीचे निवेदन देण्यात आले.