ज्युबिलंट कंपनी समोर प्राण त्यागण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:10 AM2021-04-19T04:10:52+5:302021-04-19T04:10:52+5:30

पुरंदर व बारामती तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ज्युबिलंट कंपनी मध्ये दोन वर्ष पूर्वी झालेल्या वायू गळती माध्ये जखमी झालेल्या एका ...

A warning to die in front of the Jubilant Company | ज्युबिलंट कंपनी समोर प्राण त्यागण्याचा इशारा

ज्युबिलंट कंपनी समोर प्राण त्यागण्याचा इशारा

Next

पुरंदर व बारामती तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ज्युबिलंट कंपनी मध्ये दोन वर्ष पूर्वी झालेल्या वायू गळती माध्ये जखमी झालेल्या एका कामगाराने कंपनी समोर प्राण त्यागण्याचा इशारा दिला आहे. कंपनीने अपघातानंतर त्याला कोणतीही नुकसान भरपाई न देता त्याचे उपचार सुरु असलेल्या डॉक्टरकडे खोटे वैद्यकीय दाखले मागून उपचारात अडथळा आणल्याचा आरोप केशव सहानी यांनी केले आहेत. त्यामुळे सहानी आता नीरा येथे कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषण करून प्राण त्यागणार असल्याचे नीरा येथे पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे. या बाबतचे पत्र त्याने संबंधित विभाग, मुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहेत.

दि. १७ एप्रिल २०१९ रोजी तत्कालीन ज्युबिलांत लाईफ सायन्सेस व सध्याची नाव बदललेली ज्युबिलांट इनग्रेव्हीया यां कंपनीत दुपारी चार वाजलेच्या दरम्यान अॅसेटीक अनहायड्राईड या अत्यंत घातक वायूची गळती झाली होती. यावेळी कार्यालयात काम करणाऱ्या केशव सहानी (वय २७ वर्ष) रा. नीरा प्रभाग २ हा कामगार गळती झालेल्या वायुच्या संपर्कात येऊन जखमी झाले. त्याच्या डोळ्यात व फुफुसात हा वायू गेल्याने तो गंभीर जखमी झाला.

Web Title: A warning to die in front of the Jubilant Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.