प्रभाग आरक्षणाचा मातब्बरांना फटका
By Admin | Updated: July 3, 2016 03:52 IST2016-07-03T03:52:23+5:302016-07-03T03:52:23+5:30
लोणावळा नगर परिषदेच्या डिसेंबर २०१६मध्ये होत असलेल्या निवडणुकीसाठी शनिवारी प्रभागवार आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. प्रभाग रचनेच्या याद्यादेखील प्रसिद्ध करण्यात आल्या.

प्रभाग आरक्षणाचा मातब्बरांना फटका
लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या डिसेंबर २०१६मध्ये होत असलेल्या निवडणुकीसाठी शनिवारी प्रभागवार आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. प्रभाग रचनेच्या याद्यादेखील प्रसिद्ध करण्यात आल्या.
आरक्षण सोडतीमध्ये खंडाळा, जुना खंडाळा, लोणावळा गावठाण, वलवण, तुंगार्ली, इंद्रायणीनगर या भागात सर्वसाधारणसाठी जागाच नसल्याने येथील प्रबळ दावेदार तसेच प्रस्थापित यांना आरक्षणाचा मोठा फटका बसला आहे. भांगरवाडी विभागात दोन व गवळीवाडा विभागात दोन जागा सर्वसाधारणसाठी आल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. नगर परिषदेच्या लोकसंख्येनुसार या वर्षी एक वॉर्ड वाढल्याने वॉर्ड संख्या २५ झाली असून, प्रभाग रचनेनुसार २ वॉर्डाचे ११ प्रभाग व ३ वॉर्डाचा मिळून एक असे १२ प्रभाग करण्यात आले आहेत. (वार्ताहर)
प्रभाग क्र. १ : न्यू तुंगार्ली - इंदिरानगर : अ) ओबीसी महिला, ब) सर्वसाधारण.
प्रभाग क्र. २ : तुंगार्ली गावठाण : अ : ओबीसी, ब : सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. ३ : वलवण : अ) एससी, ब) सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. ४ : नांगरगाव-भांगरवाडी : अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग क्र. ५ : भांगरवाडी : अ) ओबीसी महिला, ब) सर्वसाधारण.
प्रभाग क्र. ६ : नगरपालिका कार्यालय - इंद्रायणीनगर : अ) ओबीसी, ब) सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. ७ : आगवाला चाळ/रेल्वे विभाग : अ) एससी महिला, ब) सर्वसाधारण.
प्रभाग क्र. ८ : गवळीवाडा) : अ) ओबीसी महिला, ब) सर्वसाधारण.
प्रभाग क्र. ९ : खंडाळा : अ) एसटी, ब) सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. १० : जुना खंडाळा : अ) ओबीसी, ब) सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. ११ : लोणावळा गावठाण : अ) एससी, ब) सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. १२ : भुशी, रामनगर, हुडको : अ) एससी महिला, ब) ओबीसी महिला, क) सर्वसाधारण.