प्रभाग आराखड्याला आज मिळणार मंजुरी
By Admin | Updated: September 23, 2016 02:29 IST2016-09-23T02:29:59+5:302016-09-23T02:29:59+5:30
महापालिकेच्या ४ सदस्यीय प्रभागरचना आराखड्याला आज (शुक्रवार) निवडणूक आयोगाकडून मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर आयोगाने मंजूर केलेला आराखडा महापालिकेच्या निवडणूक

प्रभाग आराखड्याला आज मिळणार मंजुरी
पुणे : महापालिकेच्या ४ सदस्यीय प्रभागरचना आराखड्याला आज (शुक्रवार) निवडणूक आयोगाकडून मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर आयोगाने मंजूर केलेला आराखडा महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर ७ आॅक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ७ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या निवडणूक विभागाने ४ सदस्यीय प्रभागरचनेचा आराखडा तयार करून विभागीय आयुक्तांच्या समितीकडे सादर केला. या समितीने १२ सप्टेंबर रोजी तो निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. निवडणूक आयोग त्याला २३
सप्टेंबर रोजी मान्यता देणार आहे.
नागरिकांना नोंदविता येणार हरकती
प्रभाग रचनेच्या आराखड्यानुसार अनेक नगरसेवकांच्या प्रभागांची मोडतोड करण्यात आल्याची चर्चा महापालिकेत चांगलीच रंगली आहे. प्रभागरचनेचा आराखडा कधी जाहीर होणार, याकडे सर्व राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. पालिकेच्या निवडणूक विभागाकडून १० आॅक्टोबर रोजी प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केला जाईल. त्यानंतर त्यावर नागरिकांच्या हरकती मागविल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जर आराखडा तयार झाला नसेल, तर त्यावर नागरिकांना हरकती नोंदविता येणार आहेत.