शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग समिती हॉलला ठोकले टाळे; बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात नगरसेवकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 13:38 IST

भाजपाच्या बिबवेवाडी भागातील सर्व नगरसेवकांनी आज प्रभाग समितीची बैठक न घेता प्रभाग समितीच्या हॉलला टाळे ठोकून पालिकेच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. 

ठळक मुद्देप्रभाग समितीची बैठक न घेता प्रभाग समितीच्या हॉलला टाळे ठोकून अधिकाऱ्यांचा निषेध पालिकेत, राज्यात व देशात देखील भाजपची सत्ता, तरीही होत नाहीत कामे

बिबवेवाडी : बिबवेवाडी भागातील पुणे महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण शाळेच्या जागेमध्ये सरू करण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचा ठेकेदाराचा करार संपला असताना २० नोंव्हेबर २०१७ पासून बेकायदा वसुली केली जात आहे. तसेच बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तिनही प्रभागात मुख्य खात्याचे अधिकारी काम करीत नाहीत, यासाठी भाजपाच्या या भागातील सर्व नगरसेवकांनी आज प्रभाग समितीची बैठक न घेता प्रभाग समितीच्या हॉलला टाळे ठोकून पालिकेच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. 

माजी नगरसेविका अस्मिता शिंदे यांच्या संकल्पनेतून हा बॅडमिंटन हॉल या ठिकाणी बांधण्यात आला होता. पालिकेच्या शाळेची जागा वापरल्यामुळे व ही इमारत पालिकेच्या पैशातून होत असल्यामुळे येथील शाळेतील विद्यार्थांना हा हॉल मोफत खेळण्यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र या ठिकाणी प्रत्येकाकडुन पैशाची वसुली केली जात आहे. स्थानिक नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी सुरुवातीपासूनच हा हॉल बांधताना याच्या हेतू विषयी संशय व्यक्त केला होता. मात्र आमदार माधुरी मिसाळ यांनी मध्यस्थी करून येथील विद्यार्थांना चार तास मोफत हा हॉल मोफत दिला जाईल, असे अधिकाऱ्यांकडुन वदवून घेतले होते. मात्र तसे काही घडले नाही. स्थानिक नगरसेवकांचा विरोध डावलत आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांच्या अधिकारात हा हॉल ११ महिन्यासाठी ठेकेदार पद्धतीने चालवण्यास दिला. हा ठेका २० नोव्हेंबर २०१७ रोजी संपला देखील, मात्र येथील ठेकेदार अजूनही वसुली करीत आहेत. अधिकारी अर्थपूर्ण संबधामुळे याचे टेंडर लावत नाहीत असा आरोप नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी केला आहे. शिळीमकर यांनी येथील ठेकेदाराने बेकायदा वसुली केली असल्यामुळे त्यांच्यावर व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच शिळीमकर यांनी सांगितले, की इंदिरानगर भागात बेकायदा मटन दुकाने उघडली आहेत. यामुळे येथे कापलेल्या जनावराचे रक्त व चमडी ड्रेनेजच्या लाईनमध्ये टाकली जात आहे. या विषयी देखील पाठपुरावा करून सुद्धा अधिकारी कारवाई करीत नाहीत या विरोधात आम्ही जन आंदोलन उभारणार आहोत. या आंदोलनात प्रभाग समिती अध्यक्षा मानसी देशपांडे, प्रवीण चोरबेले, रुपाली धावडे, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, वर्षा साठे, अनुसया चव्हाण यांनी सहभाग नोंदवला.

सत्ताधारी असून होत नाहीत कामेबिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रमांक २८, ३६ व ३७ हे प्रभाग येतात. या तिनही प्रभागात मिळून भाजपचे ११ तर शिवसेनेचा १ नगरसेवक आहे. या प्रभाग समितीमध्ये सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे, आमदार माधुरी मिसाळ यांच्या ननंद मानसी देशपांडे असे सत्ताधारी नगरसेवक आहेत. पालिकेत, राज्यात व देशात देखील भाजपची सत्ता आहे. तरीही पालिका अधिकारी येथील कामे करत नाहीत. सत्ताधारी नगरसेवकांना अशा प्रकारे आंदोलने करण्याची गरज भासत आहे, त्यामुळे भागात वेगळी चर्चा रंगत आहे. अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी आता सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना काही आक्रमक निर्णय घेणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Puneपुणे