शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वनाजपर्यंतची मेट्रो चांदणी चौकापर्यंत जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 03:21 IST

निगडीपर्यंतच्या विस्ताराला मंजुरी; चार प्रकल्पांवर काम सुरू

पुणे : महापालिकेने महामेट्रो कंपनीला वनाज ते चांदणी चौक या मेट्रो मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पत्र दिले. महामेट्रो आता स्वारगेट ते कात्रज, नाशिक फाटा ते चाकण व पिंपरी-चिंचवड ते निगडी या चार मार्गाच्या प्रकल्प अहवालांचे काम करत आहे. त्यापैकी निगडीपर्यंत मेट्रो नेण्याच्या प्रकल्प अहवालास मंजुरी मिळाली असून, सध्या सुरू असलेल्या कामातच ते काम करण्यात येणार आहे. स्वारगेट ते कात्रज या मार्गाच्या प्रकल्प अहवालाचे पालिकेला लवकरच सादरीकरण करण्यात येणार आहे.महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. वनाज ते रामवाडी असा मेट्रो मार्ग आहे. मात्र चांदणी चौक येथे महापालिका करणार असलेल्या नियोजित शिवसृष्टीसाठी हा मार्ग चांदणी चौकापर्यंत नेण्याचा प्रस्ताव होता. साधारण सव्वा किलोमीटरचा हा मार्ग आहे. नंतर शिवसृष्टीच वादात सापडल्यामुळे या मार्गाविषयी साशंकता होती, मात्र दीक्षित यांनी महापालिकेने या मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पत्र दिले असल्याचे स्पष्ट केले.महामेट्रो एकूण चार मार्गांचे प्रकल्प अहवाल तयार करत आहे. त्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गाच्या अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याचे सादरीकरण करण्यात येईल. भुयारी व उन्नत म्हणजे रस्त्यावरून अशा दोन्ही मार्गाचे अभ्यासपूर्ण अहवाल करण्यात आले आहेत. भुयारीसाठी ३ हजार कोटी व उन्नतसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. भुयारी मार्ग ६ किलोमीटरचा असेल तर उन्नत मार्ग ८ किलोमीटरचा. त्यातील कोणता मार्ग व्यवहार्य आहे याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असे दीक्षित यांनी सांगितले.मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ५०० मीटर परिसरात जादा चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच या परिसरातील नव्या बांधकामाचे विकसन शुल्क वगैरेंबाबत महामेट्रोला अधिकार देण्यात आले आहेत. उंच इमारती वाढून तिथे लोकसंख्येची घनता वाढली की मेट्रोला प्रवासी मिळतील, अशा हेतूने हे धोरण राबवण्यात येत आहे. त्याशिवाय स्वारगेट, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट या ठिकाणी मेट्रोची मोठी संकुले बांधण्यात येत आहेत. त्यातूनही मेट्रोला उत्पन्न मिळणार आहे, असे दीक्षित म्हणाले.महामेट्रो कंपनीला मेट्रोच्या डब्यांचे उत्पादन करण्यास केंद्र व राज्य सरकारने परवानगी दिली आहे. नागपूर इथे हा कारखाना असेल. मेट्रो मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीकडून मेट्रोच्या डब्यांची निर्मिती असे उदाहरण जगात प्रथमच महाराष्ट्रात घडेल. एरवी वापरण्यात येणारे डबे चीनकडून येत असले तरी त्यात भारतासह अन्य देशांचेही तंत्रज्ञान त्यात काही प्रमाणात वापरलेले असतेच. महामेट्रो मात्र पूर्ण भारतीय बनावटीचा डबा तयार करेल.- ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

टॅग्स :Metroमेट्रो