शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरच्या मुलांसाठी उघडली बिनभिंतीची शाळा; युवकांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 06:06 IST

कानपूर, सिंधुदुर्गलाही मिळाली प्रेरणा

राजू इनामदारपुणे : रस्त्यावर भीक मागत फिरणाऱ्या त्या सात वर्षांच्या मुलाकडे पाहून त्याचे मन द्रवले, यांचे भविष्य काय असा प्रश्न त्याला पडला. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे उत्तर मिळाले व  स्वत:च त्यांना शिक्षण द्यायचे असा विचार केला. त्याच्या या विचाराला आता १२० जणांची साथ तर मिळालीच, शिवाय त्यापासून प्रेरणा घेत थेट उत्तर प्रदेशातील कानपूर व राज्यात सिंधुदुर्गमध्येही काही युवकांनी हा उपक्रम सुरू केला आहे.अभिजित पोखर्णीकर याच्या प्रयत्नामुळे आज अनेक निराधारांना किमान लिहिता वाचता येईल इतके शिक्षण मिळत आहे. त्याला शुभम माने, वैभव काचले व अशाच अनेकांची सक्रिय साथ मिळते आहे. त्यातून पुण्यात विश्रांतवाडी, शिवाजीनगर, टिळेकरनगर, मार्केटयार्ड, पाषाण, पिरंगुट या ठिकाणी रोज रस्त्यावरच्या शाळा भरू लागल्या आहेत. मुलांना तिथे अक्षरओळख करून दिली जाते. गणित शिकविले जाते. वाचनाचे पाठ दिले जातात.यासाठीच्या साहित्याचा खर्च अभिजित, शुभम, वैभव स्वत: करतात. काही जणांकडून साहित्याच्या स्वरूपात मदत घेतली जाते. आर्थिक देणग्या घेणे त्यांनी पूर्णत: टाळले आहे. समविचारी मुले त्यांना येऊन मिळत आहेत. त्यामुळेच आता अशी शाळा घेणाऱ्यांची संख्या १२० झाली आहे. त्यात मुलीही आहेत. काही ठिकाणी सकाळी १० ते १२, तर काही ठिकाणी दुपारी ४ ते ६ अशी शाळा चालविली जाते. ७ ते १७ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींचा त्यात समावेश आहे. 

आणखी शाळा सुरू करणारकानपूरमधील काही मुले पुण्यात आली असताना त्यांना या उपक्रमाची माहिती मिळाली. त्यांनी प्रेरणा घेत कानपूरमध्ये हा प्रयोग सुरू केला व यशस्वीही केला. सिंधुदुर्गमध्येही आता याची सुरुवात झाली. हे सगळे एकमेकांच्या संपर्कात असतात. पुण्यातच आता आणखी काही वस्त्यांमध्ये अशी शाळा सुरू करण्याचा अभिजित आणि त्याच्या मित्रांचा विचार आहे.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षण