शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या वेगवान प्रवाहात कोसळली स्मशानभूमीची भिंत; रस्त्यांचे झाले ओढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 18:59 IST

दुपारी अडीचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे स्मशानभूमीची भिंत कोसळली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली.

ठळक मुद्देदफनभूमीला लागून असलेली भिंत पडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अविनाश सकपाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.या पावसामुळे रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेते, हातगाडीवाले, दुचाकीस्वार यांचे प्रचंड हाल झाले.

महर्षीनगर/ बिबवेवाडी : बिबवेवाडी स्मशानभूमीची मागील बाजूची १० ते १५ फुट उंच असलेली भिंत पावसाच्या पाण्यामुळे  कोसळली. दुपारी झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे बिबवेवाडी स्मशानभूमीत पाण्याच्या प्रवाहामुळे लहान मुलांच्या दफनभूमीला लागून असलेली भिंत पडली. सुदैवाने येथे कुठलीही जीवितहानी झाली नाही.बिबवेवाडी स्मशानभूमीत विद्युत दाहीनीला लागूनच असलेल्या लहानमुलांच्या दफन भूमीसाठी मोकळी जागा आहे. परंतु येथे गेल्या पंधरा वर्षांपासून काही लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव वाचनालये, घंटागाड्या व इतर भंगारात असलेले साहित्य आणून ठेवल्यामुळे येथील मोठ्या प्रमाणावरील जागेवर भंगार साहित्याचे आतिक्रमण झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन भिंतीवर पाण्याचा दाब येऊन भिंत कोसळली. त्यामुळे भिंत कोसळल्यावर झाडांबरोबर तिथे असलेली वाचनालये पडून मदत कार्यात अडथळा निर्माण झाला. या ठिकाणी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अविनाश सकपाळ यांनी घटनास्थळी तातडीने जाऊन पाहणी करून पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या.रस्त्यांना आले ओढ्यांचे स्वरुपदुपारी २.१५ च्या सुमारास सुरुवात झालेल्या पावसाने शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे नागरीकांच्या लाखो रुपयाची उधळण करून ठेकेदाराचे खिशे भरणार्‍या अधिकार्‍यांचे उखळ पावसाने पांढरे केले आहे. बिबवेवाडी भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसाळी लाईन व ड्रेनेज लाईन टाकण्याच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र प्रत्येक वेळी अर्थपूर्ण चुका करून कमी व्यासाच्या पावसाळी लाईन या भागात टाकल्या जातात. जेणे करून दरवर्षी या रत्यावर पुन्हा-पुन्हा काम करता यावे. त्यामुळे पुन्हा रस्ता खोदावा लागतो. तसेच येथील पावसाळी लाईनला ड्रेनेज लाईन जोडल्या आहेत. त्यामुळे ड्रेनेजलाईनदेखील पावसाळ्यात ओसंडून वाहताना दिसत होत्या. 

या विषयी लोकमत ने ४ जूनच्या अंकात पावसाळी लाईनसाठी रस्त्याची खोदाई करून नागरिकांना त्रास होत असल्याची बातमी देखील प्रसिद्ध केली होती. मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधींना जाब कोण विचारणार? दरवर्षी पावसाळी लाईनसाठी लाखो रुपये खर्च करून देखील पाऊस आला की रस्त्यावर प्रचंड पाणी येते .या पावसामुळे रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेते, हातगाडीवाले, दुचाकीस्वार यांचे प्रचंड हाल झाले. अनेक दुकानात पाणी घुसले होते.

टॅग्स :RainपाऊसPuneपुणे