कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी फिरती शाळा

By Admin | Updated: June 4, 2015 05:24 IST2015-06-04T05:24:16+5:302015-06-04T05:24:16+5:30

पोटाचे खळगे भरण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी कामासाठी जाणारे व रक्ताचे पाणी करून स्वत:चे व मुलाबाळांचे पोट भरणारे कष्टकरी हंगामी

Walking school for the children of the laborers | कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी फिरती शाळा

कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी फिरती शाळा

विशाल विकारी, लोणावळा
पोटाचे खळगे भरण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी कामासाठी जाणारे व रक्ताचे पाणी करून स्वत:चे व मुलाबाळांचे पोट भरणारे कष्टकरी हंगामी कामगारांच्या मुलांची शिक्षणाविना परवड होऊ नये, याकरिता वयाच्या सत्तरीनंतरही झटणारा एक अवलिया लोणावळयात आहे़ धिरूभाई टेलर (हासमुखभाई) असे त्यांचे नाव आहे़
लोणावळा, तसेच आजुबाजूच्या परिसरात दर वर्षी कामानिमित्त शेकडो कुटुंबे वेगवेगळ्या राज्यांतून व प्रांतांतून येत असतात़ काम असेपर्यंत ही मंडळी कामाच्या ठिकाणी राहतात. काम पूर्ण झाले की, पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतात़ गाव व घर सोडून ही मंडळी जागोजागी फि रत असतात़ त्यांना कसलेही व्यवहारज्ञान नाही की, साधी अक्षरओळखी नाही़ हीच स्थिती त्यांच्या मुलांची आहे़ मात्र आई-वडिलांच्या नशिबी जे जगणे आले, ते मुलांच्या वाट्याला येऊ नये, मुले शिकावीत मोठी व्हावीत, किमान त्यांना व्यवहार ज्ञान यावे, तसेच अक्षर व शब्दांची ओळख व्हावी, याकरिता धिरूभाई यांनी या मुलांना शिक्षण देण्याचा विडा उचलला आहे़
गवळीवाडा, तसेच शहराच्या कोणत्याही भागात अशी कामगारांची कुटुंबे आली की, धिरूभाई त्यांची भेट घेऊन त्यांना शिक्षण देण्याचे काम करतात़ याकरिता त्यांनी ‘ब्राईट फ्युचर कौटुंबिक फिरती मोफत शाळा’ ही शाळा सुरू केली आहे़ या शाळेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी हे कामगार राहतात, त्यांच्या पालाच्या ठिकाणी जाऊन ते विद्यार्थ्यांना शिकवतात.

Web Title: Walking school for the children of the laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.