वालचंदनगरला सलग ९ तास मुसळधार पाऊस
By Admin | Updated: June 14, 2017 03:58 IST2017-06-14T03:58:50+5:302017-06-14T03:58:50+5:30
परिसरात १० वर्षांनंतर प्रथमच ९ तास मुसळधार पाऊस पडला. या पावसाने तहानलेल्या जमिनी ओव्हरफ्लो झाल्या. नदी, नाले, ओढ्यांना दहा-बारा वर्षांनंतर पावसाच्या

वालचंदनगरला सलग ९ तास मुसळधार पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
वालचंदनगर : परिसरात १० वर्षांनंतर प्रथमच ९ तास मुसळधार पाऊस पडला. या पावसाने तहानलेल्या जमिनी ओव्हरफ्लो झाल्या. नदी, नाले, ओढ्यांना दहा-बारा वर्षांनंतर पावसाच्या पाण्याने पूर आला. शेतात पाणी दोन फूट पाणी साठल्याने खरिपाची पेरणी लांबण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागावर वरून राजाने कृपा केल्याने दहाबारा वर्षात सर्वात जास्तचा ९ तास मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे. सर्व शिवारच जलमय झालेले दिसत आहे. काल दुपारी ३ वाजता मुसळधार पावसाने सुरूवात झाली. शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा दिला होता. पुन्हा सायंकाळी ६ वाजल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी दोन वाजेपर्यंत पावसाने विश्रांती न घेतल्याने सर्वत्र ओढे, नाले, नद्यांना पाणी आले. जोरदार पावसाने परिसरातील शेतकरी सुखावला गेला. परंतु दरवर्षी पाऊस न पडल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबून जायच्या. मात्र या ९ तास मुसळधार पावसाने १५ दिवस जमिनीस वाफसा येणार नसल्याने पेरण्या लांबणीवर जाण्याच्या शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
वालचंदनगर परिसरात मान्सून वेळेवर दाखल झाला. त्यानंतर सलग पाऊस सुरू होता. २ तास मुसळधार बरसला. या पावसामुळे तालुक्यातील लहानमोठ्या शेतकऱ्यांना फायदा झाला.
जून महिन्यात वेळेवर पाऊस झाल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होते. खरीपाच्या पेरणी वेळेवर होऊन उत्पादनात कमालीचा भर पडतो. २००६ साली सांगली शहर ज्यावेळी पाण्यात बुडाले होते त्यावेळी असा जोरदार पाऊस पडला होता. २०१२ साली जून, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांना भयानक परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आलेली होती. त्या सालापासून आजपर्यंत वेळेवर पाऊस पडलाच नव्हता.
वालचंदनगरमध्ये झालेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक शेतांना तळ््याचे स्वरुप आल्याचे दिसून आले होते. शाळा परिसर व इतर ठिकाणीही पाणी साचलेले होते.