वालचंदनगर - कळंब मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:13 AM2021-09-15T04:13:20+5:302021-09-15T04:13:20+5:30

वालचंदनगर : वालचंदनगर ते कळंब मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यातच ...

Walchandnagar - On Kalamb road | वालचंदनगर - कळंब मार्गावर

वालचंदनगर - कळंब मार्गावर

Next

वालचंदनगर : वालचंदनगर ते कळंब मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यातच भर म्हणून की काय रस्त्याच्या दुतर्फा बाजूंना काटेरी झुडपांनी विळखा घातल्याने वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज लागत नाही, परिणामी काटेरी झुडपांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सदर रस्त्याची डागडुजी करून रस्त्याच्या कडेला असणारी काटेरी झुडपे काढावीत, अशी मागणी प्रवासीवर्ग आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून होत आहे. वालचंदनगर ही मुख्य बाजारपेठ आणि औद्योगिक वसाहत असून येथील कंपनीत कळंब, चिखली,कुरवली, जांब, उद्धट, पवारवाडी,मानकरवाडी, तावशी,परिटवाडी भागातील शेकडो कामगार याच रस्त्याने तीन पाळ्यांमध्ये काम करण्यासाठी येत जात असतात. वालचंदनगर - कळंब हा रहदारीचा मुख्य मार्ग असून या मार्गावरून लांब पल्ल्याच्या एसटी बसेस येत जात असतात, कळंब गाव लोकसंख्येच्या दृष्टीने इंदापूर तालुक्यात मोठे असून येथे शैक्षणिक संकुले आहेत, येथील वालचंद विद्यालयात फडतरे शैक्षणिक संकुलात आणि विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी हजारो विद्यार्थी ये-जा करीत असतात. सदरचा रस्ता रहदारीसाठी महत्त्वाचा असल्याने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, ठेकेदाराकडून कामात हेळसांड झाल्यामुळे रस्त्याची वाट लागली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

वालचंदनगर-कळंब या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे वाढली असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

१४०९२०२१-बारामती-०४

————————————————

Web Title: Walchandnagar - On Kalamb road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.