वंचितांनी दिला गणरायला निरोप

By Admin | Updated: September 7, 2016 01:47 IST2016-09-07T01:47:45+5:302016-09-07T01:47:45+5:30

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत ढोल-ताशाच्या निनादात वंचित-विशेष मुलांनी दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिला.

Wakitika gave up to Ganaraya | वंचितांनी दिला गणरायला निरोप

वंचितांनी दिला गणरायला निरोप

पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत ढोल-ताशाच्या निनादात वंचित-विशेष मुलांनी दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिला. ऐतिहासिक विंचूरकर वाड्यापासून मिरवणूक काढण्यात आली.
मैत्रयुवा फाउंडेशनतर्फे
वंचित-विशेष मुलांसाठी
मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सहायक पोलीस आयुक्त नीलम जाधव, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष
संकेत देशपांडे, आशिष देवधर, राधिका कानडे, यश पंडित, मयूर ससाणे, अभिषेक धूत आदी
उपस्थित होते.
दारूवाला पुलाजवळील जीवनधारा शाळा, कोथरूडमधील बालसदन या संस्थांमधील वंचित-विशेष मुलांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. संकेत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Wakitika gave up to Ganaraya