शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माळीणच्या भयातून अजूनही येते मध्यरात्री जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 06:20 IST

दुर्घटनेला पाच वर्षे पूर्ण : नव्या गावात रुळताहेत ग्रामस्थ; मात्र जुन्या जखमा ताज्याच

नीलेश काण्णव घोडेगाव (पुणे) : पाच वर्षांपूर्वी ३० जुलैला पावसाने आमच्या गावावर असा काही कहर केला की सोन्यासारखं गाव क्षणात गाडले गेले. पावसाळ्यात त्या आठवणीने अजूनही दचकून जाग येते; पण जुना गाव तो गाव होता. सुरुवातीला नवीन बांधलेल्या टुमदार घरांमध्ये करमत नव्हतं, पण आता सवय झाली आहे. फक्तउन्हाळ्यात येथे पाण्यासाठी वणवण करावी लागते अशी भावना माळीण दुर्घटनेला पाच वर्षे पूर्ण होत असताना या दुर्घटनेत आपली आई गमावलेल्या तुकाराम लेंभेयांनी व्यक्तकेली.

डोंगर कोसळून गाडल्या गेलेल्या माळीण दुर्घटनेला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या दुर्घटनेत १५१ लोक मृत्युमुखी पडले. अनेक कुटुंबे बेघर, उद्ध्वस्त झाली. त्या साऱ्या जखमा सावरत माळीण पुन्हा उभे राहिले आहे. नवीन जागेत पुनर्वसन झाले असले, तरीही काळजावर कोरलेले व्रण आणि मनातल्या वेदना अजूनही मिटलेल्या नाहीत. माळीणकरांना भेटल्यानंतर त्या दिवसाची आठवण येताच प्रत्येकाला धडकी भरते. अशीच भावना सीताबाई विरणक यांनी व्यक्तकेली, डोंगर खचून गाव गाडला, गाव गेला तेव्हा असाच मुसळधार पाऊस होता. आता पाऊस दिसला, तरी भीती वाटते. पण याला आम्ही घाबरत नाय. धडाडीने येथे राहत आहोत.माळीणमधील कमल लेंभे या महिलेच्या घराची नोंद नसल्याने तिला नवीन पुनर्वसन गावठाणात घर मिळाले नाही. दुर्घटनेतून तिचे कुटुंब बचावले, मात्र घर गेले. दुर्घटनेनंतर काही दिवसांत तिचा नवरा गेला. माळीणमध्ये सामाईक घर होते. दुर्घटनेच्या काही दिवस आधी नवीन घर बांधून पूर्ण झाले होते.या घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी घातली नव्हती. नवीन पुनर्वसन गावठाणात दिराला घर मिळाले. मात्र, तिच्या घराची नोंद नसल्याने घर नाकारण्यात आले. या महिलेला घर मिळावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.माळीण दुर्घटनेत घडलेला डोंगर, या ठिकाणी बांधलेले स्मृतिवन व ग्रामस्थांनी बांधलेले मारुतीचे मंदिर.माळीणकरांच्या अजूनही काही मागण्या अपूर्ण राहिल्या आहेत. नवीन पुनर्वसित गावात पाण्याचा प्रश्न गंभीर असून पाण्यासाठी घेण्यात आलेले बोअर, विहिरीचे स्रोत वाया गेले. उन्हाळ्यात दर वर्षी नवीन गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. माळीण फाट्यावरून पाणी वाहावे लागते. यासाठी आसाणेमध्ये झालेल्या पायरडोहचे पाणी माळीणला मिळावे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस