तरुणाईला महाविद्यालय सुरू होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST2021-02-05T05:16:09+5:302021-02-05T05:16:09+5:30

राज्यातील इयत्ता पाचवीपासून ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, महाविद्यालयांचे प्रवेशद्वार अजूनही विद्यार्थ्यांसाठी खुले झाले नाही. महाविद्यालयामध्ये ...

Waiting for youth to start college | तरुणाईला महाविद्यालय सुरू होण्याची प्रतीक्षा

तरुणाईला महाविद्यालय सुरू होण्याची प्रतीक्षा

राज्यातील इयत्ता पाचवीपासून ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, महाविद्यालयांचे प्रवेशद्वार अजूनही विद्यार्थ्यांसाठी खुले झाले नाही. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारी तरुणाई शहरातील मॉल्स, हॉटेल्स, उद्यानामध्ये तसेच पर्यटन स्थळी फिरताना दिसत आहे.सर्व ठिकाणी तरुणाई जाऊ शकते. परंतु, महाविद्यालयात जाता येत नसल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे ३८ क्वॉरंटाईन सेंटर सुरू करण्यात आले होते. नोव्हेंबर महिन्यातच बहुतांश सर्व क्वॉरंटाईन बंद करण्यात आली होती. वेळोवेळी राज्य शासनाला या संदर्भातील माहिती पाठविण्यात आली तरीही राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने याबाबत अहवाल तयार करण्यासाठी समिती स्थापन केले आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी तब्बल पंधरा दिवसांहून अधिक कालावधी लागला. मात्र आता सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात हालचाली केल्या जात आहेत. परंतु , विद्यालय सुरू करण्यासंदर्भात अंतिम निर्णय होत नसल्याने शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने लवकर महाविद्यालय सुरू करावी ,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Waiting for youth to start college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.