एसटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:09 IST2021-06-20T04:09:41+5:302021-06-20T04:09:41+5:30
पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ९७ हजार कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही. दर महिन्याला ७ तारखेला ...

एसटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत
पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ९७ हजार कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही. दर महिन्याला ७ तारखेला होणारे वेतन अजून मिळाले नसल्याने कर्मचारी चिंतातूर झाले आहेत.
राज्य सरकारने नुकतेच एसटीसाठी ६०० कोटी दिले असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र तो निधी अद्याप एसटीकडे वर्ग झाले नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा लवकरात लवकर वेतन मिळावे, अशी मागणी कर्मचारी करीत आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, ६०० कोटी निधीदिल्याबद्दल शासनाचे आभार. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी आहे. त्यात एक दिवस जरी वेतन उशिरा झाले तरी कर्मचाऱ्यांच्या संसाराचे बजेट कोलमडते. त्यामुळे शासनाने दिलेल्या निधीची रक्कम तत्काळ एसटीकडे वर्ग करावी.