प्रतीक्षा दरेकर ठरली ‘गीतम स्कॉलरची विजेती
By Admin | Updated: January 19, 2016 01:55 IST2016-01-19T01:55:16+5:302016-01-19T01:55:16+5:30
प्रत्येक मुलामुलींत चांगले कलागुण असतात. करिअरला कलागुणांची जोड मिळाल्यास यश हे निश्चित असते. त्यामुळे मुलांनी स्वत:मधील कलागुण ओळखून त्या

प्रतीक्षा दरेकर ठरली ‘गीतम स्कॉलरची विजेती
पुणे : प्रत्येक मुलामुलींत चांगले कलागुण असतात. करिअरला कलागुणांची जोड मिळाल्यास यश हे निश्चित असते. त्यामुळे मुलांनी स्वत:मधील कलागुण ओळखून त्या आधारे करिअरची निवड केली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. विशाल गायकवाड यांनी केले.
करिअरच्या दृष्टीने बारावीचा टप्पा फार महत्त्वाचा असतो. मुलांना त्याचे गांभीर्य कळत नाही. मुले अभ्यास न करता आपला अमूल्य वेळ व्हॉट्सअॅप व फेसबुकसारख्या सोशल मीडियावर घालवतात. सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे मुले आपल्या ध्येयापासून भरकटत आहेत व त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन वेळ वाया जातो. याचा फटका त्यांना भविष्यात बसतो. उत्तम भविष्य घडवायचे असल्यास मुलांनी व्हॉट्सअॅप व फेसबुकपासून लांब राहणे गरजेचे असल्याचा सल्ला पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक विशाल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला. लोकमत व गीतम युनिव्हर्सिटी यांच्या वतीने अयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये असि. डायरेक्टर गीतम युनिव्हर्सिटीचे एम. सुरेंद्र बाबू व प्राध्यापक चिप्पा प्रवीण कुमार यांनी मार्गदर्शन केले. तसेच, विद्यार्थी आणि पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
बारावीनंतर ज्या महाविद्यालयातून वा इन्स्टिट्यूटमधून प्लेसमेंट मिळते व जेथे विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत, अशाच ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पाहिजे. पुणे शहरातील १0 महाविद्यालयांत गीतम स्कॉलर (सामान्यज्ञान) परीक्षा घेण्यात आली. ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. विविध महाविद्यालयांतून घेण्यात आलेली गीतम स्कॉलरची अंतिम फेरी व पालकांसाठी ‘पापा कहते है’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. (प्रतिनिधी)