सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा : राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:13+5:302021-02-05T05:02:13+5:30

एका पुरस्कार वितरण समारंभानिमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे हे पुणे दौऱ्यावर ते आले होते. यावेळी ते बोलत होते. टोपे म्हणाले, ...

Waiting for four to five months for vaccination of ordinary citizens: Rajesh Tope | सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा : राजेश टोपे

सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा : राजेश टोपे

एका पुरस्कार वितरण समारंभानिमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे हे पुणे दौऱ्यावर ते आले होते. यावेळी ते बोलत होते. टोपे म्हणाले, ''लसीकरण करणाची मोहीम राबविताना लसींच्या संख्येत कमतरता होणार नाही. आता आरोग्याच्या दृष्टीने पुरेसा लसींचा साठा मिळाला आहे. तसेच पुढेही आवश्यक लसींच्या उपलब्धतेसाठी सरकार योग्य ते पाठपुरावा करत राहील. आता लसीकरणासाठी लोक स्वतःहून पुढे येत आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे.''

----

याचा अर्थ कुठे तरी चुकते आहे...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याप्रती आदर आहे. राज्य व देशासाठी त्यांनी चांगले काम केले आहे. जलसंधारण आणि इतर कामे चांगली केली आहेत. मात्र कृषी कायद्यांच्या विरोधात ते आंदोलन करत आहेत. याचा अर्थ केंद्र सरकार कुठे तरी चुकत आहे. म्हणून आंदोलनाला महत्व आहे. मनधरणी केली जात आहे, ही समाधानाची गोष्ट आहे

Web Title: Waiting for four to five months for vaccination of ordinary citizens: Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.