शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

‘अग्निशामक’ संग्रहालयाला प्रतीक्षा दर्शकांची

By admin | Updated: February 6, 2017 06:22 IST

आगीचे भीषण तांडव असो की नैसर्गिक आपत्ती असो, अपघात असो की महत्त्वाची बचावकार्ये असोत पुणे अग्निशामक दलाचे जिगरबाज अधिकारी आणि जवान धावून जातात.

पुणे : आगीचे भीषण तांडव असो की नैसर्गिक आपत्ती असो, अपघात असो की महत्त्वाची बचावकार्ये असोत पुणे अग्निशामक दलाचे जिगरबाज अधिकारी आणि जवान धावून जातात. पुणे अग्निशामक दलाच्या स्थापनेपासून ते आजवरच्या इतिहासाची झलक दाखवणारे आणि कर्तृत्वशाली कामगिरींचा लेखाजोखा मांडणारे प्रदर्शन अद्यापही दर्शकांच्या प्रतीक्षेत आहे. नागरिकांना हे संग्रहालय पाहण्यासाठी आकर्षित करण्याच्या दृष्टीने पालिकेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. अग्निशामक दलाच्या एरंडवणा केंद्रामध्ये हे संग्रहालय महापालिकेमार्फत उभारण्यात आलेले आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. पुणे नगरपालिकेची १८५६मध्ये स्थापना झाली. १८८४पर्यंत सार्वजनिक सुरक्षेचे काम शासनाकडे होते. त्या दरम्यानच्या आगीच्या घटनांना कसे तोंड देण्यात आले याचा इतिहास उपलब्ध नाही. मात्र, १८८४ ते १९१४ या काळायत हातपंप अथवा मॅन्युअल इंजिनाचा वापर केला जात होता. दूरध्वनीची व्यवस्था नसल्याने धावत जाऊन अथवा शिटी वाजवत जाऊन वर्दी द्यावी लागत असे. १९१२-१३मध्ये नगरपालिकेने २ लँड स्टीम फायर खरेदी केले. त्यानंतर बैलगाडीमधून ओढून न्यावे लागणारे हे यंत्र १९२४मध्ये मोटारीमध्ये बसवण्यात आले. १९४२मध्ये पुणे नगरपालिका, उपनगर विभाग आणि कॅन्टोन्मेंट विभागांनी एकत्रित फायरवाला सहकारी संघ स्थापन केला. १९५०मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यावर अनेक छोटी खेडी, गावे मनपाच्या हद्दीत आली. त्यावेळी ६ हॉर्सपॉवरचे ५ पोर्टेबल पंप, २ टे्रलर पंप, ४५० गॅलन पाणी वाहून नेणारे २ वॉटर टँकर अशी साधने घेण्यात आली. कालानुरुप अग्निशामक दलाचे स्वरूप विस्तारत गेले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अधिकाधिक पदे भरण्यात आली. सध्या पुणे अग्निशामक दलात १४ केंद्रे कार्यरत असून, काही केंद्र प्रस्तावित आहेत. अग्निशामक दलाने २००९ ते २०१४ या कालावधीत ३० हजार आगीच्या घटनांचा सामना केला आहे. या संग्रहालयामध्ये अग्निशामक दलाचा इतिहास, कायदे आणि घटनांची माहिती देण्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या स्थापनेपासून वापरण्यात आलेली वाहने, साधने यांचीही माहिती देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय अग्निशमन सेवा अकादमी व महाविद्यालयाची तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी प्राण पणाला लावून सामना केलेल्या आगीचा प्रमुख घटनांची माहिती, वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकांचाही संग्रहालयात समावेश केला आहे. आपत्ती आलीच तर काय करावे याचेही मार्गदर्शन याठिकाणी पाहायला मिळते. हे संग्रहालय म्हणजे पुणेकरांच्या रक्षणासाठी सज्ज अग्निशामक दलाच्या जिगरबाज कामगिरीचा इतिहास आहे. जवानांच्या सोईसुविधा, सेवांकडे दुर्लक्ष केले जाते. जवानांकडे होणारे दुर्लक्ष एकवेळ मान्य आहे, मात्र त्यांचे कर्तृत्व तरी नाकारू नका, अशी प्रतिक्रिया जवानांमधून दिली जाते. येथे उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)