शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात प्रचारासाठी काँग्रेसला देशपातळीवरील नेत्यांची प्रतिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 20:31 IST

प्रियांका गांधी, शत्रुघ्न सिन्हा, महंमद अझरूद्दीन, नवज्योतसिंग सिध्दु यांचा रोड शो, तर शत्रुघ्न सिन्हा, सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया, अशोक गेहलोत आदी नेत्यांच्या सभांसाठी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपुर्वीच पुण्यात विद्यार्थ्यांशी साधला संवाद शेवटच्या तीन-चार दिवसांत नेत्यांच्या सभा

पुणे : प्रचारासाठी आता केवळ सहा दिवस उरलेले असताना काँग्रेसला देशपातळीवरील नेत्यांची प्रतिक्षा आहे. शहर काँग्रेसकडून प्रचारासाठी नेत्यांची यादी पाठविली असली तरी अद्याप एकाही नेत्याचे नाव अंतिम झालेले नाही. सध्या प्रचारासाठी पदयात्रा, कोपरा सभा आणि भेटीगाठींवरच भर दिला जात आहे.येत्या रविवारी (दि. २१) प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. केवळ सहा दिवस राहिल्याने उमेदवारांकडून मतदारसंघ पिंजून काढला जात आहे. प्रामुख्याने थेट मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांकडून चढाओढ सुरू आहे. त्यासाठी पदयात्रा काढल्या जात आहेत. निवडणुकांमध्ये सभांनाही प्राधान्य दिले जाते. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी शहरात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील या दोघांची प्रत्येकी एक सभा झाली आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले आहे. तसेच लोकशाहीवादी संघटनांनी आयोजित केलेल्या मेळाव्यालाही चव्हाण यांनी हजेरी लावली. मात्र, याव्यतिरिक्त राज्य व देशपातळीवरील नेत्यांची काँग्रेसला अद्याप प्रतिक्षा आहे. शहर काँग्रेसकडून काही दिवसांपुर्वीच प्रचारकांची यादी प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आली आहे. त्यामध्ये प्रियांका गांधी, शत्रुघ्न सिन्हा, महंमद अझरूद्दीन, नवज्योतसिंग सिध्दु यांचा रोड शो, तर शत्रुघ्न सिन्हा, सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया, अशोक गेहलोत आदी नेत्यांच्या सभांसाठी मागणी करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपुर्वीच पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यामुळे त्यांची सभा होणार नाही. देशभरात सर्वत्र निवडणुका सुरू असल्याने स्टार प्रचारकांना प्रत्येक मतदारसंघात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे ४८ तास आधी त्यांच्या सभेचा दिवस समजतो. सोमवारपर्यंत कोणत्याही नेत्याच्या सभेचे नियोजन अंतिम झालेले नाही. सध्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांमार्फत कोपरा सभांमधून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. दररोज तीन-चार कोपरा सभा घेतल्या जात आहेत. शेवटच्या तीन-चार दिवसांत नेत्यांच्या सभा होतील. याबाबत एक-दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक