शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे तिथे काय उणे! थांबा थांबा..., एका व्यक्तीने थेट मेट्रोचं थांबवली अन् दरवाजा उघडण्याची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 15:20 IST

एक व्यक्ती घाईघाईत मेट्रो स्थानकावर येत ड्रायव्हरच्या केबीनकडे जाऊन दार वाजवून उघडण्याची विनंती करते

पुणे : पुणेमेट्रो काही मार्गांवर सुरु झाल्यापासून अनेक विनोदी किस्से घडू लागले. पुण्यात अजूनही मेट्रो परिपूर्ण धावत नसल्याने नागरिक त्यातून फक्त फिरण्याचा आनंद घेत होते. सुट्टीच्या दिवशी तर अनेक कुटुंब मेट्रोने फिरताना दिसून येत होते. परंतु नरेंद्र मोदींनी दोन विस्तारित मार्गांचे उदघाटन केल्यावर अनेकांनी मेट्रोने कामानिमित्त प्रवास करण्यास सुरुवात केली. तसेच मेट्रो प्रशासनाकडून गाड्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. अशातच पुन्हा एकदा मेट्रोबाबतीत एक विनोदी किस्सा समोर आला आहे. एसटी किंवा बस स्टॉपवरून सुटल्यावर लोकं ज्याप्रमाणे थांबवतात. त्याप्रमाणे मेट्रो स्टेशनवरून निघाल्यावर थांबा थांबा म्हणत एका व्यक्तीने थेट मेट्रो थांबवली असून दरवाजा उघडण्याची विनंती केली आहे. 

एक ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. त्यांनी दगडूशेठचे दर्शन घेऊन मेट्रो, आवास योजना अशा प्रकल्पांचे उदघाटन केले. त्यानंतर दोन विस्तारित मार्गावरून मेट्रो धावण्यास सुरुवात झाली. सद्यस्थितीत नागरिकांचा मेट्रोला चांगलाच प्रतिसाद दिसून येत आहे. त्यातच मेट्रो थांबवण्याचा विनोदी किस्सा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ट्विटरवरून पुणे सिटी लाईफ या पेजवरून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

व्हिडिओमधून एक व्यक्ती घाईघाईत मेट्रो स्थानकावर येते. ड्रायव्हरच्या केबीनकडे जाऊन केबीनचे दार वाजवून उघडण्याची विनंती करते. त्यावेळी  मेट्रोचालक तातडीने दारं उघडतात आणि व्यक्ती मेट्रोत बसतो. तर दुसरा एक व्यक्तीसुद्धा उशीर झाला असताना घाईघाईत निघालेल्या मेट्रोला हात करून दरवाजे उघडण्याची विनंती करतो आणि नंतर बसून प्रवास करतो.  

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोpassengerप्रवासीSocial Viralसोशल व्हायरलticketतिकिट