शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पुण्यात भारत-इंग्लंड झुंजणार ; पण प्रेक्षकांना असणार 'नो एन्ट्री'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 19:33 IST

भारत आणि इंग्लंड दरम्यानचे एकदिवसीय सामने पुण्यात होणार की नाही याबाबतची अनिश्चितता संपली आहे.

पुणे : भारत आणि इंग्लंड दरम्यानचे एकदिवसीय सामने पुण्यात होणार की नाही याबाबतची अनिश्चितता संपली आहे. पुण्यातील महाराष्ट क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर भारत- इंग्लंड दरम्यान खेळले जाणारे सामने खेळविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या धोक्यामुळे प्रेक्षकांना हा थरार अनुभवता येणार नाही. प्रेक्षकांविनाच हे सामने खेळविले जाणार आहेत. 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर, गव्हर्नींग कौन्सिलचे अध्यक्ष मिलींद नार्वेकर यांच्यासोबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर भारत- इंग्लंड दरम्यानचे सामने खेळविण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. इंग्लंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. नियोजनाप्रमाणे पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर तीन सामने होणार आहेत. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटचे सामने होण्याबाबत अनिश्चितता होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने ही अनिश्चितता संपली आहे. 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सामने घेण्यासाठी आवश्यक तयारी करण्यास सुरूवात केल्याचे काकतकर यांनी सांगितले. पुण्यातील स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामन्यांना परवानगीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीEnglandइंग्लंडIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या