शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कायमस्वरुपी वाहन परवान्यासाठी चार महिने थांबा ! आरटीओतील स्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 17:30 IST

राज्यातील सर्वाधिक वाहन नोंदणी होणाऱ्या कार्यालयात पुणे आरटीओ कार्यालयाचा वरचा क्रमांक लागतो.

ठळक मुद्देसुट्टीच्या दिवशी कामकाज सुरु ठेवण्याची उमेदवारांची मागणी शहर आणि परिसरातून वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्या देखील अधिकशिकाऊ आणि पक्क्या वाहन परवान्यासाठी ऑनलाईन दिवस आणि वेळ आरक्षित करावा लागतो. शिकाऊ परवाना घेतल्यानंतर ३० दिवसांनी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतल्यास या त्रासातून सुटकाअधिकाऱ्यांच्या मान्यतेने सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल

पुणे : कायमस्वरुपी वाहनपरवाना मिळविण्यासाठी चार महिने थांबा, अशी स्थिती प्रादेशिक परिवहन विभागाची (आरटीओ) झाली आहे. त्रस्त उमेदवारांनी बुधवारी आरटीओ कार्यालयात धरणे धरत, सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरु ठेवण्याची मागणी केली. पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळ आणि वाहन परवाना प्रलंबित असलेल्या उमेदवार आंदोलनात सहभागी झाले होते. शहरातील वाहनसंख्येचे चाळीस लाखांच्या दिशेने घोडदौड सुरु केली आहे. राज्यातील सर्वाधिक वाहन नोंदणी होणाऱ्या कार्यालयात पुणे आरटीओ कार्यालयाचा वरचा क्रमांक लागतो. त्यामुळे साहाजिकच शहर आणि परिसरातून वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. शिकाऊ आणि पक्क्या वाहन परवान्यासाठी ऑनलाईन दिवस आणि वेळ आरक्षित करावा लागतो. शहरात शिकाऊ वाहन परवान्याच्या तुलनेत पक्क्या वाहन परवान्याचा कोटा कमी आहे. त्यामुळे पक्क्या परवान्यासाठी आॅनलाईन अपॉईंटमेंट घेतल्यास थेट चौथ्या महिन्यातील तारीख मिळत आहे. शिकाऊ परवान्यासाठी देखील एक ते दीड महिन्याची प्रतिक्षा यादी आहे. पक्क्या वाहन परवान्याची प्रतिक्षा यादी ६ हजारांच्यावर गेली असल्याची तक्रार पुणे शहर ड्रायव्हिंग असोसिअशनच्या वतीने, आरटीओ कार्यालयाकडे करण्यात आली आहे. शिकाऊ परवाना काढल्यानंतर उमेदवाराला ९० दिवसानंतर पक्क्या वाहन परवान्यासाठी दिवस आरक्षित होत नाही. त्यामुळे उमेदवाराला पक्क्या परवान्याची परीक्षा देता येत नाही. शिकाऊ परवान्याची मुदत सहा महिन्यांसाठी असते. त्याची मुदत संपेपर्यंत पक्का परवान्याची वेळ आरक्षित करण्याची मुभा दिली पाहिजे. वाढती प्रतिक्षा यादी कमी करण्यासाठी दुसरा व चौथा शनिवार, तसेच दर रविवारी देखील वाहन परवान्याची चाचणी सुरु ठेवावी अशी मागणी संघटना आणि उमेदवारांच्या वतीने आरटीओ कार्यालयाकडे करण्यात आली आहे. याबाब माहिती देताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे म्हणाले, पक्क्या वाहन परवान्यासाठी चौथ्या महिन्यातील तारीख मिळत असल्याची तक्रार उमेदवारांनी केली. प्रतिक्षा यादी कमी करण्यासाठी शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरु करण्याचा विचार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी परवानगी दिल्यानंतर सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज सुरु करण्यात येईल. --शिकाऊ परवानाधारक उमेदवार अनेकदा शेवटच्या महिन्यात पक्क्या परवान्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेताना दिसतात. शिकाऊ परवाना घेतल्यानंतर ३० दिवसांनी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतल्यास या त्रासातून सुटका होऊ शकते. प्रतिक्षा यादी कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मान्यतेने सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल. - विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर