दौंड येथे वाहेगुरू कोविड क्वारंटाईन सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:12 IST2021-05-09T04:12:07+5:302021-05-09T04:12:07+5:30
यात कोविड रुग्णांना चहा-नाश्ता, दोन वेळेचे जेवण, आरोग्यवर्धक काढा, हळदीचे दूध व वैद्यकीय सेवा मोफत ...

दौंड येथे वाहेगुरू कोविड क्वारंटाईन सेंटर
यात कोविड रुग्णांना चहा-नाश्ता, दोन वेळेचे जेवण, आरोग्यवर्धक काढा, हळदीचे दूध व वैद्यकीय सेवा मोफत देण्यात येत आहे. दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पन्नास खाटांच्या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. समीर कुलकर्णी ,डाॅ. सिध्दार्थ कुलकर्णी, डॉ.शलाका लोणकर , डॉ.क्षितिजा कुलकर्णी , डॉ. विक्रम नारंग . डॉ.राजेश दाते , डॉ.दीपक जाधव , डॉ.सुनीता कटारिया यांच्यासह, मान्यवर उपस्थित होते. डाॅ. संग्राम डांगे यांनी या कोविड केंद्रात पॉझिटिव्ह रुग्णांनी विलगीकरण होऊंन कोरोनाचा संसर्ग रोखावा, असे आवहान केले.
सर्व रुग्णांना सर्व सुखसोयी तसेच करमणुकीचे साधन उपलब्ध करून त्यांच्यात सकारात्मक भावना निर्माण करून सर्वांच्या सहकार्याने लवकरात लवकर सर्व रुग्णांना बरे करून दौंडशहर कोरोना मुक्त करण्याचा निर्धार वाहेगुरू सेवा संगत संस्थेने केला आहे. वाहेगुरू संगतचे प्रमुख राम दावरा अशोक नारंग, शंकर दावरा, मोहन नारंग, सुदाम नारंग, निलकमल लुंड, विजय भागवानी, जीतू आहुजा, दीपक पारदासनी, सुशील सुखेंजा, विजय दावरा, गणेश नारंग तसेच संस्थेच्या इतर सेवकांनी सुद्धा हे सेंटर सुरू करण्यास सहभाग घेतला.