वाघोलीला होणार स्वतंत्र पोलीस स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST2021-01-08T04:29:03+5:302021-01-08T04:29:03+5:30
आव्हाळवाडी : राज्य सरकारने पुणे शहरालगतची तेवीस गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पोलीस आयुक्तालयात नवीन सहा ...

वाघोलीला होणार स्वतंत्र पोलीस स्टेशन
आव्हाळवाडी : राज्य सरकारने पुणे शहरालगतची तेवीस गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पोलीस आयुक्तालयात नवीन सहा पोलीस ठाण्यांची वाढ होणार आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस स्टेशनच्या संख्येत वाढ होणार आहे. नवीन सहा पोलीस ठाण्यांबाबत सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
नवीन सहा पोलीस स्टेशनबाबत शिक्कामोर्तब झाल्याने येत्या २६ जानेवारी रोजी ही नवीन पोलीस ठाणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. सध्याच्या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीकोनातून हा महत्वाचा निर्णय ठरणार आहे.
---
प्रतिक्रिया :
वाघोली येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन करावे या मागणीसाठी मी उपसरपंच असताना मागील बावीस वर्षांपूर्वीच ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेण्यात आला होता. पोलीस स्टेशनला वीस गुंठे जागा देखील देण्यात आली आहे. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर पाठपुराव्याला यश मिळाले आहे. - राजेंद्र सातव पाटील (माजी उपसरपंच, वाघोली)