शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण चा विरोधात वाघोलीच्या नागरिकांचे उपोषण.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 14:33 IST

लाईट जात असल्याने वर्क फ्रॉम होम मध्ये अडचणी. जास्त बिल आणि वीज जोड तोडण्याला वैतागले नागरिक.

वाढत्या कोरोना मुळे ऑफिस ला जाताना येईना आणि घरात लाईट जात असल्याने काम करता येईना अशी अवस्था वाघोलीकरांची झाली आहे. वारंवार तक्रार करून देखील ही परिस्थिती बदलत नाही हे लक्षात आल्यावर आता वाघोलीकरांनी या प्रश्नावर थेट आंदोलन सुरु केला आहे. वाघोलीचा रहिवासी नागरिकांनी १५ तारखेपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. 

वाघोलीचा समावेश पुणे महापालिकेचा हद्दीत येण्याचा प्रस्ताव आला तरी इथल्या बेसिक नागरी समस्या सुटायला तयार नाहीयेत. वारंवार एका एका प्रश्नावर प्रश्नाचे लक्ष वेधून देखील अनेक प्रश्न सुटायला तयार नाहीत. आणि वाघोलीकरांचा मते आता यात भर पडली आहे ती वीजपुरवठ्याचा अडचणींची. वर्क फ्रॉम होम करताना सतत वीजपुरवठा खंडित होण्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी आता थेट उपोषण सुरु केले आहे. १५ मार्च  पासून या साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. 

उपोषण करण्याची वेळ का आली हे सांगताना एक रहिवासी म्हणाले " वर्क फ्रॉम होमी करताना अचानक लाईट गेली की काम करताना अडचणी येतात. वायफाय बंद पडते. त्यातच आता मोठ्या मोठ्या रकमांचे बिल आले. त्यातच आता बिल भरला नाही म्हणत विजेचे कनेक्शन कट करायला सुरुवात करण्यात आली आहे. या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन करायला सुरुवात केली आहे."

याविषयी बोलताना वाघोलीचे रहिवासी संजीव पाटील म्हणाले "आम्ही यासंदर्भात महावितरण चा अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधला आहे. पण प्रश्न सुटत नाहीये त्यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे."

 

 

टॅग्स :Puneपुणेwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसmahavitaranमहावितरणcivic issueनागरी समस्या