अष्टविनायकच्या धर्तीवर वढू-तुळापूरचा विकास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:13 IST2021-09-22T04:13:31+5:302021-09-22T04:13:31+5:30

अशोक पवार : श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील दोन कोटी ७५ लाखांच्या कामांचा प्रारंभ --- कोरेगाव भीमा ...

Wadu-Tulapur will be developed on the lines of Ashtavinayak | अष्टविनायकच्या धर्तीवर वढू-तुळापूरचा विकास करणार

अष्टविनायकच्या धर्तीवर वढू-तुळापूरचा विकास करणार

अशोक पवार : श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील दोन कोटी ७५ लाखांच्या कामांचा प्रारंभ

---

कोरेगाव भीमा : सरपंच किती दिवस पदावर आहे यापेक्षा किती चांगले काम करतो यावर गावचा विकास अवलंबुन असतो. अष्टविनायकच्या धर्तीवर वढू-तुळापूरचा विकास करण्यावर भर देत शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत चालण्यासाठी बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना आमदार ॲड. अशोक पवार यांनी केल्या.

श्री क्षेत्र वढू बुद्रूक (ता. शिरूर) येथील नळ पाणीपुरवठा योजना, खुली व्यायामशाळा, दशक्रिया घाटावरील इमारत, हायमास्ट दिवे, सार्वजनिक सौचालय, भंडारे वस्तीवरीळ शाळा इमारत, आरसीसी गटर लाईन अशा दोन कोटी ७५ लाखांच्या विकासकामांचा उद्घाटन व भूमिपूजनप्रसंगी आमदार ॲड. अशोक पवार बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे आमदार अरुण लाड, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, जिल्हा बँकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, माजी उपसभापती सुभाष उमाप, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, साहेबराव भंडारे, अंकुश शिवले, सरपंच अनिल शिवले, सणसवाडीच्या सरपंच सुनंदा दरेकर, आपटीच्या सरपंच रूपाली ढगे, उपसरपंच हिरालाल तांबे, ग्रामपंचायत सदस्य माउली भंडारे, अनिल भंडारे, कृष्णा आरगडे, राहुल कुंभार, अंजली शिवले, सारिका शिवले, रेखा शिवले, संगीता सावंत, रोहिनी भंडारे, अनिता भंडारे, शीलावती भंडारे, ग्रामविकास अधिकारी मिलिंद केंज आदी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले की, शिरुर-हवेलीचा विकास करीत असताना २००९ सालच्या आधी तालुक्यात फक्त बाराशे ट्रान्सफाॅर्मर होते. त्यानंतर पाच वर्षांत ती संख्या २८५० ने वाढवीत शेतकऱ्यांना अखंड वीज देण्याचा प्रयत्न केला. या भागाचा विकास करताना विधान परिषदेचे आमदार अरुण लाड यांच्याकडे वढूमध्ये सुसज्य असे कृषिभवन बांधून देण्याची मागणी यावेळी आमदार पवार यांनी केली. त्यावेळी आमदार अरुण लाड यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून निधी देण्याचे आश्वासन दिले

चौकट : आम्हाला मोकळ करा!

वढूतील कार्यक्रमात आमदार अशोक पवारांनी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांच्या कार्याचे कौतुक करताना वढूसह आपटी, वाजेवाडी पिंपळे जगताप गावाने भरघोस मत तुम्हाला दिले आहे. मात्र तुम्ही निधी देताना तिकडच्या पारड्यात जास्त लक्ष असते. तसेच इकडे पण लक्ष द्या, असे सांगत आता आम्हाला मोकळ करा असे सूचक विधान केल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिरुर-हवेलीतील वढू बुद्रुकसह चार गावांची तर मागणी केली नाही ना, याची चर्चा कार्यक्रमानंतर रंगली.

--

फोटो क्रमांक : २१ कोरेगाव भीमा अशोक पवार विकासकामे

फोटो : श्री क्षेत्र वढू बुद्रूक (ता. शिरूर) येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आमदार ॲड. अशोक पवार, अरुण लाड, आदी उपस्थित होते.

210921\20210920_121605-01.jpeg

फोटो : श्री क्षेत्र वढू बुद्रूक (ता. शिरूर) येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अ‍ॅड अशोक पवार , अरुण लाड व इतर मान्यवर

Web Title: Wadu-Tulapur will be developed on the lines of Ashtavinayak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.